Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»विनयभंग व खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल आरोपीला ६ दिवसांची पोलिस कोठडी!

ताज्या बातम्या

विनयभंग व खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल आरोपीला ६ दिवसांची पोलिस कोठडी!

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

शेअर मार्केटच्या आमिषातून तरुणीची १० लाखांची फसवणूक;

भुसावळ शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची शेअर मार्केटमध्ये आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात आर्थिक फसवणुकीसह लग्नासाठी दबाव, पाठलाग, घरात घुसून चाकूचा धाक दाखवत विनयभंग, तसेच अश्लील फोटो मॉर्फ करून बदनामीची धमकी दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपी सिद्धान्त मनोज हेडा याला अटक केली असून न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयित आरोपी सिद्धान्त मनोज हेडा (रा. गंगाराम प्लॉट, भुसावळ) याने पीडित तरुणीशी असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगून तिच्या डिमॅट अकाउंटची माहिती घेतली. त्यानंतर त्या अकाउंटमधून तसेच क्रेडिट कार्डचा वापर करून आरोपीने सुमारे १० लाख रुपये लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे. आर्थिक फसवणुकीनंतर आरोपीने पीडितेवर लग्नासाठी दबाव टाकला. तिने नकार दिल्यानंतर आरोपीने मुंबई ते मंगलोरपर्यंत तिचा पाठलाग केला. पुढे तिच्या घरात घुसून तोंड दाबत चाकूचा धाक दाखवून विनयभंग केला आणि पालकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच पीडितेचे वैयक्तिक फोटो मॉर्फ करून ते इंटरनेटवर प्रसारित करण्याची आणि कुटुंबातील व्यक्तींची बदनामी करण्याची धमकी देत इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपवरून सतत संदेश पाठवून मानसिक त्रास दिला.
हे फोटो व डेटा डिलीट करण्यासाठी आरोपीने पुन्हा १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

शासकीय ITI समोरील कचरा संकलन केंद्र हटवा; विद्यार्थ्यांसह अभाविपचे ठिय्या आंदोलन

September 17, 2026

कांचन नगरात तरुणावर शस्त्राने हल्ला; तिघांना अटक करून पोलिसांनी काढली धिंड

September 17, 2026

माऊलीनगरात कौटुंबिक वादातून प्राणघातक हल्ला; चार जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

September 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add