Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली

जळगाव

महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला

जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात हा निर्घृण खून असल्याचे स्पष्ट होत असून, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,  बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना जंगल परिसरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मृत महिलेचा देह कंबरेपासून वरच्या भागात पूर्णपणे जळालेला असून, त्यामुळे तिची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे बिअरची बाटली आढळून आली आहे. त्यामुळे मारेकऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत हा गुन्हा केला असावा किंवा महिलेला गुंगीचे पेय देऊन तिची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांना आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हा खून दोन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसून येत असल्याने हा खून अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आल्याचा संशय अधिक बळावला आहे.

एरंडोल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून, जिल्ह्यातील तसेच शेजारील तालुक्यांतील बेपत्ता महिलांच्या नोंदी तपासून मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे पद्मालय परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add