Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»यावल तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांकडून यांची प्रशासक म्हणूण नियुक्ती करा

राजकारण

यावल तालुक्यातील सरपंच, उपसरपंच व सदस्यांकडून यांची प्रशासक म्हणूण नियुक्ती करा

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 6, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहें

यावल : यावल तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा कार्यकाळ लवकरच संपत असून शासनाकडून प्रशाषक नेमवणूक करण्यात येत असून सरपंच यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावल तालुका सरपंच परिषद (मुंबई) यांच्या मार्फत गट विकास अधिकारी पंचायत समिती यावल व जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे करण्यात आली.

यावल तालुक्यातील ४४ ग्राम पंचायतीच्या सरपंच उपसरपंच व सदस्याचा कार्यकाळ २० फेब्रुवारी २०२६ रोजी संपत आहे. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषद (मुंबई) शाखा यावल याच्या वतीने सरपंच परिषदचे यावल तालुका अध्यक्ष संदिप प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सरपंच उपसरपंच व सदस्यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत ४४ ग्राम पंचायत सरपंच उपसरपंच व सदस्याचा कार्यकाळ संपत आहे. त्याठिकाणी शासनाने १९९३ मध्ये सरपंच यांना प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्याप्रमाणे मुदत संपणाऱ्या ग्राम पंचायतीच्या प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला.

१ प्रोसीडींग बुकांची नक्कल व १९९३ साठी नियुक्ती करण्यात आलेल्या सरपंच यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. त्या आदेशाची प्रत यावल पंचायत समिती व जळगाव जिल्हा परिषद यांना देऊन शासनाने त्वरीत सरपंच यांना प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात यावे, या आशयाचे निवेदन सरपंच परिषदचे तालुकाध्यक्ष संदिप सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली यावल तालुक्यातील सरपंच उपसरपंच व सदस्यं मार्फत यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी साकळी येथील सरपंच दिपक पाटील, भालोद येथील प्रदिप कोळी, ज्योती कोळी, अजय भालेराव, नौशाद तडवी, अशोक तायडे, रोहीदास कोळी तालुक्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add