Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पारोळा तालुक्यातील शवेगे बुद्रुक फाट्यावर गावठी कट्ट्यासह एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले

ताज्या बातम्या

पारोळा तालुक्यातील शवेगे बुद्रुक फाट्यावर गावठी कट्ट्यासह एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले

Editorial DeskBy Editorial DeskFebruary 7, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पारोळयात गावठी कट्ट्यासह एकास अटक

पारोळा : पारोळा तालुक्यातील शवेगे बुद्रुक फाट्यावर गावठी कट्ट्यासह एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यातील शेवगे बुद्रुक परिसरात रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनातून काही शस्त्र जाणार असल्याची गोपनीय माहिती येथील पोलिस स्टेशनला मिळाल्याने पोलीसांनी सापळा रचला व गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या दोघांपैकी एकास पारोळा पोलिसांनी जेरबंद केले तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला.

याबाबत पारोळा पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना दि ४ फेब्रुवारी रोजी रात्री बहादरपूर-पारोळा रस्त्यावर शस्त्रधारी व्यक्ती फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. ५ रोजी रात्री सुमारे दीड वाजता शेवगे बुद्रुक येथील वळणाजवळ एमएच १९ सि वाय २५७५ क्रमांकाची कारला संशयावरून अडवण्यात आले गाडीत शुभम गणेश महाजन वय १९, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल व योगेश रमेश पाटील वय २४, रा. शेवगे बुद्रुक, ता. पारोळा हे दोघे आढळले.

झडतीदरम्यान योगेश पाटील याच्या कमरेला बेकायदेशीर गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत असताना योगेश पाटील हा पोलीसांना गुंगारा देत अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला तर शुभम महाजन याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी गावठी कट्टा व मारुती स्विफ्ट कारसह सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add