Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»तरुणाची दलालांनी विवाहितेस नववधु दाखवून केली फसवणुक

ताज्या बातम्या

तरुणाची दलालांनी विवाहितेस नववधु दाखवून केली फसवणुक

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 7, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

लग्नासाठी अडीच लाखात फसवणूक : सात ताब्यात! रोकड हस्तगत :

यावल तालुक्यातील मालोद येथील एका ३५ वर्षीय तरुणास विवाह करिता मुलगी देतो असे सांगत एका विवाहितेलाच नववधू आणि तिचे खोटे नातेवाईक उभे करून तरूणाचे लग्न लावले होते. या पोटी त्यांच्या कडून २ लाख ५४ हजार रुपये उकळले होते. तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मावस भाऊचा अपघात झाला असा बनाव करून पसार होण्याच्या बेतात नववधूचे वागणे संशयास्पद वाटले व सदर बिंग फुटले. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास लावत सर्व सात संशयीतांना ताब्यात घेतले व त्यांच्या कडून १ लाख ७० हजाराची रोकड व दागीने जप्त केले आहे.

मालोद ता. यावल या गावात दिनेश शालिक पाटील वय ३५ हा अविवाहित तरुण राहतो. समाजात नोकरी नसल्यामुळे मुलगी मिळत नाही म्हणून त्यांनी काही दलालांच्या मार्फत त्याने आपले लग्न जुळवले होते. या दलालांनी त्याच्याकडून लग्न जुळवणे व विवाहितेला काही दागिने आणि इतर साहित्य खरेदी करणे असा खर्च सांगून २ लाख ५४ हजार रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर मालोद या गावात दिनांक १२ जानेवारी रोजी विवाह पार पडला.

दरम्यान विवाहाच्या दुसऱ्याच्या दिवशी नववधू दिव्या लक्ष्मण पवार, खरे नाव कृतिका ऋतिक जावरे रा. बादसर ता. भडगाव हिने सांगितले की माझ्या मावस भावाचा अपघात झाला आहे. मला गावी तात्काळ जावे लागेल. मात्र मावसभाऊ कुठे राहतो, काय करतो, कसा झाला अपघात, त्याचे नाव काय हे सांगताना मात्र तिची फजिती उडाली आणि पाटील कुटुंबाला संशयाला तेव्हा त्यांनी तिला थेट दिनांक १३ जानेवारी रोजी यावल पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी सखोल चौकशी करत पैसे घेऊन लग्न करून नंतर नववधू देखील तेथून पळून जायची असं हे रॅकेट कार्यरत असल्याचे उघडकीस आणले.

याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावल पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, सहायक फौजदार वसंत बेलदार यांनी या गुन्ह्यात पुनम सुरेश भिल्ल रा. अडावद ता. चोपडा, दिव्या लक्ष्मण पवार खरे नाव कृतिका ऋतिक जावरे रा. बादशर ता. भडगाव, हल्ली मुक्काम धुळे, मनोहर युवराज अहिरे रा. अमरदे ता. शिंदखेडा जि. धुळे, बाळा उर्फ यशोदीप किरण पाटील रा. अजंदे ता. शिरपूर जि. धुळे व एक वधूची बनावट आई, बनावट आत्या आणि बनावट आजी अशा सात जणांना टप्प्या टप्प्याने अटक केली. यातील काही जणांना न्यायलयीन कोठडीत पाठवण्यात आले तर महिलांनी पोलिसांना तपासात सहकार्य व मुद्देमाल आणून दिल्याने त्यांना नोटीस वर सोडण्यात आले आहे.

१ लाख ७० हजाराची रोकड, दागीने जप्त

या गुन्ह्यातील नववधु व तिचे बनावट नातेवाईक तसेच पत्रकार म्हणुन ओळख दाखवणारे अहिरे यांच्या कडून व इतर दलालांकडून पोलिसांनी १ लाख ७० हजाराची रोकड जप्त केली. तसेच या चांदीचे दागीने, साड्या, बेनटेक्सचे मंगळसुत्र असे ४ हजार २६१ रूपयाचे दागीने जप्त करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add