Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»शहरात वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेने जोरदार कारवाई केली.

जळगाव

शहरात वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेने जोरदार कारवाई केली.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 18, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव महापालिकेची अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई, साहित्य जप्त

जळगाव । जळगाव शहरात वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेने जोरदार कारवाई केली. शहरातील नवी पेठ परिसरासह टॉवर चौक परिसरातील जैन मंदिरासमोरील अतिक्रमण हटवून मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त करण्यात आले. महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळपासूनच नवी पेठ परिसरात कारवाईला सुरुवात केली. विशेषतः टॉवर चौक परिसरात रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक जागेत अनधिकृतपणे ठेवण्यात आलेल्या लोखंडी पेट्या, हातगाड्या आणि इतर साहित्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाने कठोर पावले उचलत जैन मंदिरासमोरील परिसरातील अतिक्रमण हटवले.

लोखंडी पेट्या आणि हातगाड्या जप्त

या कारवाईदरम्यान एकूण २० लोखंडी पेट्या आणि ६ हातगाड्या जप्त करण्यात आल्या. जप्त करण्यात आलेले साहित्य महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आले असून संबंधितांवर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. अतिक्रमण हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आणि नागरिकांना दिलासा मिळाला.

महानगरपालिकेने शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी अतिक्रमणविरोधी मोहिमेची तीव्रता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातही सार्वजनिक रस्ते, चौक आणि फूटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नियमित कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

जळगावात इंधन टंचाईचे सावट; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

May 19, 2026

लग्नाचे आमिष…दोन वर्षे अत्याचार… नंतर लग्नास नकार; नराधमावर गुन्हा दाखल !

May 19, 2026

“मला आनंदाने जाऊ द्या…” जळगावात ‘बी.टेक’च्या विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपवली

May 19, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add