
होळीनिमित्त मध्य रेल्वेकडून १८६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय.. भुसावळ, जळगावकरांनाही फायदा
जळगाव। शिमग्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. होळीनिमित्त गावी जाणाऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने तब्बल १८६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष सेवांमध्ये ९४ होळी विशेष गाड्या तर ९२ अतिरिक्त विशेष गाड्यांचा समावेश आहे.या विशेष गाड्या मुंबई–नागपूर, सावंतवाडी रोड, बनारस, गोरखपूर, समस्तीपूर, दानापूर तसेच पुणे–नागपूर, हजरत निजामुद्दीन आणि दानापूर या मार्गांदरम्यान धावणार आहेत. त्यामुळे उत्तर भारतासह विदर्भ, कोकण आणि इतर भागात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष यातील अनेक गाड्या जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणार असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल.
कोणत्या गाड्या कोणत्या वेळेत धावणार आहेत ते घ्या जाणून…
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (10 सेवा)
ट्रेन क्रमांक 02141 द्वि-साप्ताहिक विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवार आणि मंगळवारी 22 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान 12.20 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी ३.१० वाजता पोहचेल.
ट्रेन क्रमांक 02142 नागपूर येथून दर रविवार आणि मंगळवारी 8 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 1.30 वाजता पोहोचेल.
या गाड्या दिनांक 22 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी रोजी विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक 1 मार्च, ३ मार्च आणि 8 मार्च रोजी होळी विशेष (6 सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
थांबा – दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (4 सेवा)
ट्रेन क्रमांक 01171 26 फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर गुरुवारी 12.20 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे 12.30 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01172 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी सावंतवाडी रोड येथून 5.20 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 3.45 वाजता पोहचेल.
या गाड्या 26 फेब्रुवारी रोजी विशेष गाड्या (2 सेवा) आणि 5 मार्च रोजी होळी विशेष (2 सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
थांबा- दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.
3. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष (३२ सेवा)
ट्रेन क्रमांक 01079 दैनिक विशेष दि. २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज २२.३० वा. सुटेल व गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी १०.०० वा. पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01080 विशेष २३.०२.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान गोरखपूर येथून दररोज १४.३० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वा. पोहोचेल.
या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०२.०३.२०२६ विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते १०.०३.२०२६ होळी विशेष (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.


