Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»दक्षता पेट्रोलपंपावर १.३३ कोटींचा अपहार; पोलीस उपनिरीक्षक फरार, गुन्हा दाखल !

जळगाव

दक्षता पेट्रोलपंपावर १.३३ कोटींचा अपहार; पोलीस उपनिरीक्षक फरार, गुन्हा दाखल !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 18, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत.

जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी व्यवस्थापक असलेले पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (५७, रा. साईनगर, निमखेडी शिवार) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

जिल्हा पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत भास्कर मार्केटसमोरील दक्षता पेट्रोलपंप चालविला जातो. या पंपावरील दैनंदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी वाल्मीक वाघ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून सोपविण्यात आली होती. दररोज पेट्रोल व डिझेल विक्रीतून जमा होणारी रोख रक्कम बँकेत भरणा करणे, त्याची अचूक नोंद ठेवणे तसेच रोखवही व भरणा पावत्या अद्ययावत ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती.

दि. १२ फेब्रुवारी रोजी वाघ यांचा मुलगा शेखर वाघ यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आपल्या वडिलांनी कोणालाही न सांगता घर सोडले असून पेट्रोलपंपाच्या हिशोबात मोठी गडबड झाल्याचे पत्राद्वारे कळविले. या माहितीची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी तात्काळ व्यवहारांची पडताळणी करण्याचे आदेश मानव संसाधन विभागाचे प्रभारी संदीप पाटील यांना दिले.  तपासणीदरम्यान पेट्रोलपंपाच्या तिजोरीत केवळ १ लाख ९६ हजार २१९ रुपये रोख आढळले. मात्र बँकेत रक्कम जमा केल्याच्या पावत्या व संबंधित कागदपत्रे उपलब्ध नव्हती. त्यामुळे सखोल लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आले.

लेखापाल एस. आर. पलोड यांनी दि. १ एप्रिल २०२५ ते दि. ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. त्यानुसार एकूण ४ कोटी ९३ लाख ७३ हजार ६८६ रुपयांची रोख विक्री झाली होती. त्यापैकी केवळ ३ कोटी ५९ लाख २५ हजार १८ रुपयेच बँकेत जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार झाल्याचे लेखापरीक्षणातून स्पष्ट झाले.

प्रभारी संदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाणे येथे वाल्मीक वाघ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (५) (लोकसेवकाद्वारे फौजदारी विश्वासघात) आणि कलम ३१८ (४) (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.

तक्रारीनुसार, वाघ यांना वेळोवेळी रोख रक्कम बँकेत भरणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच रोखवही व भरणा पावती पुस्तक सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे बहाणे करून कागदपत्रे दाखविण्यास टाळाटाळ केल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी उपनिरीक्षक फरार असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच तांत्रिक पुराव्यांच्या आधारे त्यांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add