Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली.

ताज्या बातम्या

परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 19, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

बारावी परीक्षा केंद्रावर तोडफोड; अफसर खानसह १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर प्रतिनिधी – मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलमध्ये सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश करून तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकरणी शिंदे शिवसेना पक्षाचा राज्यस्तरीय प्रदेश अध्यक्ष पद भूषवणारा अफसर खान याच्यासह दहा ते पंधरा जणांवर मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास परीक्षा केंद्राच्या मागील बाजूने दहा ते पंधरा जणांनी प्रवेश करत खिडक्यांच्या जाळ्या तोडल्या तसेच लोखंडी गेटची तोडफोड केली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्राच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेत संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. परीक्षा प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

परीक्षा केंद्राचे संचालक तथा अंतुर्ली येथील तराळ विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रामकृष्ण बाऊस्कर (वय ५८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी बारावीचा भौतिकशास्त्राचा पेपर सुरू असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने मुख्य प्रवेशद्वारातून परीक्षा केंद्रात अनधिकृत प्रवेश केला. संबंधित व्यक्ती सुमारे एक ते दीड तास मोबाईलवर संभाषण करत होती. त्यानंतर तो केंद्राबाहेर निघून गेला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add