
भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
भुसावळ प्रतिनिधी : पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भुसावळ–दादर मार्गावरील विशेष गाड्यांच्या कालावधी पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भुसावळहून जळगाव, धरणगाव, अमळनेर, शिंदखेडा, दोंडाईचा आणि नंदुरबारमार्गे मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाडी दादर–भुसावळ (०९०४९) आणि भुसावळ–दादर (०९०५०) यांचा कालावधी २७ मार्च पर्यंत वाढवण्यात आला आहे. आठवड्यातून तीन दिवस सोमवार, बुधवार आणि शनिवारी धावणाऱ्या त्रिसाप्ताहिक विशेष गाडी दादर–भुसावळ (०९०५१) आणि भुसावळ–दादर (०९०५२) यांचा कालावधी २८ मार्च पर्यंत वाढवण्यात आला आहे.


