Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शालेय विद्यार्थ्यांना घेऊन वडगावच्या दिशेने निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात

ताज्या बातम्या

शालेय विद्यार्थ्यांना घेऊन वडगावच्या दिशेने निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 23, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा आगारातून ५० प्रवाशी आणि शालेय विद्यार्थ्यांना घेऊन वडगावच्या दिशेने निघालेल्या एसटी बसला भीषण अपघात होता होता वाचला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने कट मारल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल खड्यात घसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून एक मोठा अनर्थ टळला आहे.


सोमवारी २२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता बस क्रमांक (MH 14 BT 2611) पाचोरा स्थानकातून निघाली होती. मोंढाळे ते निंभोरी गावांच्या दरम्यान, माजी सरपंच मीनाक्षी दिवटे यांच्या शेताजवळ ही घटना घडली. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरने बसला जोरात कट मारला. रस्ता अरुंद असल्याने आणि पाचोरा ते सातगाव (डोंगरी) रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे साईड पट्टीवर टाकलेल्या कच्च्या मातीमुळे बसचा चाक घसरले आणि बस खड्यात शिरली.


अपघात घडताच मोठा आवाज झाला आणि बसमधील विद्यार्थी ओरडू लागले. ही दृश्ये पाहताच स्थानिक ग्रामस्थ अर्जुन राठोड, भगवान नलावडे, सागर पाटील, रामराव दिवटे आणि कोतवाल महेंद्र राऊतराय यांच्यासह अनेक तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. बसच्या काचा फोडून अडकलेल्या ५० प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. या धडकेत बसच्या चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.


घटनेची माहिती मिळताच पाचोरा आगार व्यवस्थापक प्रकाश पाटील यांनी पथकासह घटनास्थळी पोहोचून प्रवाशांची विचारपूस केली. रस्त्याच्या कामामुळे पसरलेल्या मातीमुळे चालकाला बस सावरताना अडचण आल्याचे प्राथमिक दर्शनी समोर आले आहे. क्रेनच्या साहाय्याने बसला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली होती.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add