
पंढरपूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे.
पंढरपूर तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूला विष पाजण्याचा कट रचला, मात्र या घटनेत तिचा पती समोनाथ लोहार दुर्दैवी मृत्युमुखी पडला. पोलिसांनी मृत समोनाथ लोहार यांची पत्नी सारिका लोहार आणि तिचा प्रियकर शेखर चंदनशिवे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलिस तपासानुसार, सारिका आणि शेखर यांच्यात अनैतिक प्रेमसंबंध होते, ज्याला समोनाथ लोहार यांची सासू विरोध करत होती. यामुळे पत्नीने शेखरच्या सूचनेनुसार १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी सातच्या सुमारास शेतात भेट घेऊन पांढऱ्या रंगाचे विषारी औषध अर्धवट भरलेल्या बिस्लरीच्या बाटलीत घेतले. रात्री आठच्या सुमारास घरात कोणीही नसतानाच सारिकाने सासूच्या पिण्याच्या कळशीत विष टाकले. सासूने पाणी पिऊन पाहिले, त्याची चव कडू असल्याने तांब्यात ठेवलेली मुलगी जवळ ठेवल्याचे निदर्शनास आले.
त्याच तांब्यातील पाणी मुलीने जेवणानंतर पिले, त्यानंतर संपूर्ण रात्री उलट्या आणि त्रास सुरू झाला. उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता, १६ जानेवारी २०२६ रोजी समोनाथ लोहार यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुरुवातीला पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही. मात्र, लोहार समाजाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पत्नीने सासूवर विष प्रयोग करून जीव घेण्याचा कट रचल्याचे निष्पन्न झाले. पोलिस कारवाईत सारिका लोहार आणि शेखर चंदनशिवे यांना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने पंढरपूर तालुक्यातील समाजामध्ये मोठा धक्काच निर्माण झाला असून, पोलिसांच्या त्वरित कारवाईची मागणी केली जात आहे.


