Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जळगावच्या शहरातील सुपुत्राला दादासाहेब फाळके पुरस्कार ; बॉलिवूडमध्ये ‘रायझिंग स्टार’ म्हणून गौरव

ताज्या बातम्या

जळगावच्या शहरातील सुपुत्राला दादासाहेब फाळके पुरस्कार ; बॉलिवूडमध्ये ‘रायझिंग स्टार’ म्हणून गौरव

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 24, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

एका होतकरू तरुणाला दादासाहेब फाळके पुरस्कार (रायझिंग स्टार इन बॉलिवूड) प्रदान करण्यात आला

जळगाव । जळगावसाठी अभिमानाची बाब म्हणजे शहरातील एका होतकरू तरुणाला दादासाहेब फाळके पुरस्कार (रायझिंग स्टार इन बॉलिवूड) प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका बेदी यांच्या हस्ते सहारा स्टार मुंबई येथे आयोजित भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

कल्पना शिंदे आणि रामकृष्ण रामदास शिंदे (माजी लाईन चेकिंग ऑफिसर, जळगाव) यांचे सुपुत्र असलेल्या या तरुणाने आपल्या कुटुंबाचे आणि जळगावचे नाव उज्ज्वल केले आहे. साध्या कुटुंबातून येऊनही त्यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले.

इंजिनिअरिंग आणि एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडवली असून सध्या ते पुण्यातील एका अग्रगण्य कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी आपल्या अभिनयाच्या आवडीला जोपासले आणि स्वप्नांच्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली.

त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि मेहनतीला आता राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून बॉलिवूडमध्ये ‘रायझिंग स्टार’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या यशस्वी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पुरस्कार स्वीकारताना त्यांनी आपल्या आई-वडिलांचे आणि सर्व शुभेच्छुकांचे आभार मानले. “हा पुरस्कार माझ्या कुटुंबाचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे,” असे त्यांनी सांगितले. जळगाव शहर त्यांच्या या यशाचा अभिमान बाळगत असून तरुणांसाठी ते एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add