Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»८ लाखांच्या लूटमारीतील ७ सराईत जेरबंद; रावेर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

ताज्या बातम्या

८ लाखांच्या लूटमारीतील ७ सराईत जेरबंद; रावेर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

६७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कामगिरी

जळगाव : बऱ्हाणपूरच्या मसाला व्यापाऱ्याची गाडी अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात रावेर पोलिसांना मोठे यश आले आहे. रावेर गुन्हे शोध पथकाने शिताफीने तपास करत ७ संशयितांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आणि रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ‘हसन फावड्या’ पोलिसांना हुलकावणी देऊन पसार झाला आहे.

नेमकी घटना काय?

बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना वसुलीसाठी सावदा, फैजपूर आणि रावेर परिसरात पाठवले होते. वसुली आटोपून रात्री ९ वाजेच्या सुमारास कर्मचारी परतत असताना खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ जणांच्या टोळीने त्यांची दुचाकी अडवली. शस्त्राचा धाक दाखवून या टोळीने पैशांची बॅग हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी तातडीने गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरुवातीला अडचणी आल्या, मात्र पोलिसांनी जिद्द न हारता रावेर, सावदा आणि फैजपूर परिसरातील तब्बल ६७ सीसीटीव्ही फुटेज तपासले. सुरुवातीला संशय वसुली कर्मचाऱ्यांवरही होता, मात्र तांत्रिक तपासातून बाहेरील टोळीचा सहभाग स्पष्ट झाला.

खबऱ्याच्या माहितीने गुन्हेगार जाळ्यात

तपास सुरू असतानाच डॉ. विशाल जयस्वाल यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून खालील ७ जणांना ताब्यात घेतले:पोलिसी खाक्या दाखवताच या सातही जणांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ९५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि २ लाख ५५ हजार रुपये रोख, असा एकूण ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

‘हसन फावड्या’चा शोध सुरू

या संपूर्ण लुटीचा मास्टरमाईंड शेख हसन शेख अफजल ऊर्फ ‘हसन फावड्या’ (रा. रुस्तम चौक, रावेर) हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांची चाहूल लागताच तो फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

या पथकाने केली कामगिरी

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुजर व अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, पीएसआय तुषार पाटील, सुनील वंजारी, कल्पेश आमोदकर, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकारोद्दीन शेख, अतुल गाडीलोहार आणि गजानन बोने यांच्या पथकाने ही कारवाई केली. सायबर सेलचे गौरव पाटील व मिलिंद जाधव यांनी तांत्रिक तपासात मदत केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड लांबली; राजकीय मतभेदांमुळे प्रक्रिया पुढे ढकलली

March 17, 2026

युद्धामुळे सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ ; सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम

March 17, 2026

धरणगाव तालुक्यातील पाळधीत काम सुरू असतानाच पर्यटन प्रकल्पाचा स्लॅब कोसळला; ७ कामगार जखमी

March 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add