Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»नगरपरिषद पाचोराची डिजिटल झेप, एआय-आधारित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट लोकार्पण

ताज्या बातम्या

नगरपरिषद पाचोराची डिजिटल झेप, एआय-आधारित व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉट लोकार्पण

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraFebruary 28, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय चा वापर करत व्हॉटसअप चॅटबॉटची निर्मिती केली आहे.

जळगाव । पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय चा वापर करत व्हॉटसअप चॅटबॉटची निर्मिती केली आहे. या चॅटबॉटच्या माध्यमातून पाचोरा नगरपालिकेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची माहिती तसेच तक्रार निवारण बाबतची माहिती नागरिकांपर्यंत व्हाट्सॲपवर पाठविण्यात येणार आहे. या अत्याधुनिक चॅटबॉटचे लोकार्पण आज नगराध्यक्षा सूनिताताई किशोरआप्पा पाटील व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पाचोरा नगरपालिकेच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष किशोर बारवकर, शिवसेना गटनेता सुमीत किशोरआप्पा पाटील, भाजपा गटनेता सूरज वाघ, सभापती सतीश चेडे, सभापती प्रवीण ब्राह्मणे, सभापती रेहमान तडवी, सभापती प्रियांका पाटील, सभापती मीनाक्षी एरंडे तसेच सर्व नगरपरिषद नगरसेवक व नगरसेविका हे उपस्थित होते.

असा आहे चॅटबॉट
पाचोरा नगरपरिषदेने नागरिकांसाठी ऑटोमेशन आणि एआय व्हॉटसअप चॅटबॉट्स उपलब्ध करुन दिला आहे. हा चॅटबॉट नागरिकांच्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे देईल आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करेल. यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्यांसाठी अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्याची गरज लागणार नाही. नागरिकांना आवश्यक असलेली माहिती घरबसल्या उपलब्ध होऊ शकणार आहे. पहिल्यांदाच एका नगरपरिषदेत असा एआय चॅटबॉटचा वापर केला आहे. यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी, सुविधा तसेच सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add