Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»प्रियकराच्या कृत्याने हादरा गरोदर प्रेयसीच्या पाणीपुरीत मिसळले चक्क विष

ताज्या बातम्या

प्रियकराच्या कृत्याने हादरा गरोदर प्रेयसीच्या पाणीपुरीत मिसळले चक्क विष

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 1, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

एका तरुणाने गरोदर प्रेयसीला पाणीपुरीतून विष टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली

पाणीपुरी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. मात्र याच आवडीचा फायदा घेऊन एका तरुणाने गरोदर प्रेयसीला पाणीपुरीतून विष टाकून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही. याप्रकरणी संबंधित तरुणीने पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील रामकांडा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. करण (बदलेलं नाव ) आणि सिमरन (बदलेलं नाव ) हे दोघेही गेल्या ६ वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. करणने सिमरनला लग्न करण्याचं आमिष देऊन तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. दरम्यान त्यांना एक मूल झाले. करण आणि सिमरनचे प्रेमसंबंध गावात वाऱ्यासारखे पसरले. समाजाच्या विरोधामुळे दोघेही वेगळे झाले. मात्र काही महिन्यांनी करण पुन्हा सिमरनला जाऊन भेटला.

त्यानंतर पुन्हा त्यांनी ठेवलेल्या शरीरसंबंधातून सिमरन ८ महिन्यांची गरोदर राहिली. सिमरनने मात्र त्यानंतर करणकडे लग्न करण्याचा तगादा लावला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. करणने सिमरनला संपवण्याचा कट रचला. सिमरनला पाणीपुरी आवडते म्हणून त्याने पाणीपुरी आणली. परंतु ही साधीसुधी पाणीपुरी नव्हती तर, या पाणीपुरीमध्ये करणने विष मिसळलं होत.

पाणीपुरी खाऊन झाल्यावर पीडितेला उलट्यांचा त्रास होऊ लागला. सुरुवातीला तो सामान्य असल्याचं तिला वाटलं. मात्र नंतर तिला अधिक त्रास होऊ लागल्याने तिने आरोपीला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची विनंती केली. आरोपीने रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी तरुणीला एका घनदाट जंगलात घेऊन गेला. तिथे तिच्यावर हल्ला करत तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने तिथून स्वतःची सुटका करत जीव वाचवला आणि तातडीने पोलीस ठाणे गाठत प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add