
प्रमुख पाहुणे डॉ संगीता बियाणी यांनी रेल्वे मधील महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – भुसावळ येथील रेल्वेच्या इलेक्ट्रीक लोको शेड मध्ये होली के रंग महिलाओ के संग कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. प्रमुख पाहूणे म्हणून बियाणी एज्यूकेशन गृपच्या सेक्रेटरी डॉ.संगिता बियाणी,इलेक्ट्रिक लोको शेडचे मुख्य अभियंता चाणक्य जैन व त्यांच्या पत्नी प्रियंका जैन उपस्थित होत्या.यावेळी प्रमुख पाहुणे डॉ संगीता बियाणी यांनी रेल्वे मधील महिला कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रियंका जैन यांनी शेड मधील महिलांसाठी प्रथमच विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी रेल्वे कर्मचारी महिलांना मार्गदर्शन केले. प्रसंगी महिलांनी आपले कला गुण सादर केले. गुणवंत रेल्वे कर्मचारी महिलांना चाणक्य जैन व प्रियांका जैन यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. तसेच शेड मधील महिलांनी होळी खेळून कार्यक्रम साजरा केला. या वेळी हास्पयोगा देखिल सादर करण्यात आला होता. सूत्रसंचालन मुन्सफ अली यांनी तर आभार ज्योती समुद्रे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ओएस राजीव कुमार सिंग, ज्योती समुद्रे यांच्या सह शेड मधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


