Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»स्मार्ट मीटरमुळे हजारो ग्राहक त्रस्त; ऐन परीक्षेच्या काळात वीजेचा लपंडाव, बिल भरूनही लाईन बंद

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटरमुळे हजारो ग्राहक त्रस्त; ऐन परीक्षेच्या काळात वीजेचा लपंडाव, बिल भरूनही लाईन बंद

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ शहरात स्मार्ट मीटरमुळे सुमारे ३० टक्के ग्राहक त्रस्त झाले आहेत.

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरात स्मार्ट मीटरमुळे सुमारे ३० टक्के ग्राहक त्रस्त झाले आहेत. मीटर ऑनलाइन झाल्याने बिल न भरल्यास वीजखंडित होतेय, तर बिल भरूनही काहींची वीज गुल झाली आहे. सध्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला . विज आवश्यक आहे परंतु विजेचा लंपडाव सुरूच असल्याने संताप वाढला आहे.

काल तापी नगर परिसरात अशा अनेक तक्रारी समोर आल्या.ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेत अडचणी येत आहेत. बिल भरले तरी सिस्टम अपडेट न होताच वीज बंद पडते. सिस्टीम वर बिल भरल्या बरोबर लाईट सुरू व्हायला पाहीजे तर बिल भरूनही सात ते आठ तास लाईन बंद होती .”परीक्षेच्या वेळी वीज नसल्याने मुले त्रस्त आहेत. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी बिल वेळेवर भरायचो लाईन सुरळीत असायची, आता मात्र रोज त्रास सहन करावा लागतोय,” असे तापी नगरातील एका ग्राहकाने सांगितले. 23 फेब्रुवारी रोजी शहरात सुमारे हजारो कुटुंबे या समस्येने प्रभावित झाले होते . अडव्हान्स टेक्नॉलॉजी च्या नावाखाली ग्राहकांना स्मार्ट मिटर बसवून मंडळाने काय साधले आहे . असा सवाल ग्राहक करीत आहेत. विज निर्मिती केंद्र जवळच असुनही नियमित पणे विज न मिळणे ही मोठी शोकांतिका आहे . यात यंत्रणेची चुकी आहे का अधिकारी यांच्या हलगर्जीपणा आहे याबाबत चौकशी होणे गरजेचे आहे .

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते की, सामान्य ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवली जाणार नाहीत. मात्र भुसावळात हा आदेश धाब्यावर बसवून सर्वच सामान्य घरांमध्येही स्मार्ट मीटर बसवली गेली आहेत. यामुळे ग्राहकांतून रोष निर्माण झाला आहे. “मुख्यमंत्र्यांचा आदेश असताना शहरातील प्रत्येक घरात मीटर कसे बसवले? याचा अर्थ काय?” असा प्रश्न उपस्थित केला जातोय.महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मात्र याला खंडन केले आहे. “आम्हाला असा कोणताही आदेश मिळालेला नाही. सर्व ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्याची योजना आहे. तांत्रिक अडचणी असल्यास तक्रार नोंदवा याचा अर्थ असा होतो विद्युत मंडळ महाराष्ट्र शासनाच्या कक्षेत येत नाही किंवा मुख्यमंत्र्यांच्या विधान सभेतील विधानाला वितरण विभाग मानत नाही.या संदर्भात ग्राहक संघटना आंदोलनाची तयारी करत आहेत.

काय सांगतात तज्ज्ञ?

तज्ज्ञांच्या मते, स्मार्ट मीटरमुळे ऊर्जा बचत होते, पण प्रारंभिक टप्प्यात सॉफ्टवेअर ग्लिचमुळे अशा समस्या उद्भवतात. भुसावळासारख्या शहरात ३०% मीटर बसवले तरी पूर्ण सिस्टम एकत्रित होईपर्यंत त्रास कायम राहील. ग्राहकांनी ऑनलाइन पोर्टलऐवजी स्थानिक कार्यालयात बिल भरून रसीद घ्यावी, अशी सूचना दिली जाते. जर तुमची सिस्टीम अपडेट नाही तर मिटर ऑनलाईन करण्याची घाई कश्यासाठी याबाबत ग्राहक आता विज नियामक मुख्यसचिवांकडे तक्रार करणार असून, तातडीने स्मार्ट मीटर लावणे बंद करण्याची मागणी करत आहेत. ही समस्या सुटेपर्यंत शहरातील वीजपुरवठा सुरळीत राहील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे .

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add