Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»रावेर तालुक्यातील पाल येथे वृंदावन धाम आश्रमात अध्यात्मिक रंगाची उधळण

ताज्या बातम्या

रावेर तालुक्यातील पाल येथे वृंदावन धाम आश्रमात अध्यात्मिक रंगाची उधळण

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 4, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

एक दिवसीय होळी महोत्सव साजरा करण्यात आले त्यामध्ये भक्तिमय वातावरणात कोरड्या व ओल्या रंगांची रंगारंग होळी साजरी करण्यात आली.

रावेर प्रतिनिधी : पाल ता रावेर सातपुड्याच्या कुशीत वसलेले रावेर तालुक्यातील परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रम श्री वृंदावन धामात सालाबादाप्रमाणे यंदाही दि 2 मार्च रोजी फाल्गुनी पौर्णिमा होळी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या सानिध्यात अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारातर्फे एक दिवसीय होळी महोत्सव साजरा करण्यात आले त्यामध्ये भक्तिमय वातावरणात कोरड्या व ओल्या रंगांची रंगारंग होळी साजरी करण्यात आली.

या महोत्सवात सकाळी अकरा वाजेला अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे पचरंगी ध्वजचे अनावरण श्रध्येय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज सह आश्रम समर्पित ब्रम्हचारी यांच्याकडून करण्यात आले. त्यानंतर श्री हरिधाम मंदिरात स्थित परम पूज्य सदगुरु संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी च्या समाधी स्थळी पूजन व दर्शन करण्यात आले. त्यानंतर श्रद्येय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या रसाळ अमृत वाणीतून साधकांना होळी महोत्सवाचे महात्म्य व होलिका दहनाचा संदेश देण्यात आले.

परम पूज्य बापूजीच्या संकल्पनाने निर्मित हॆ होळी महोत्सव किमान वीस ते बावीस वर्षांपासून निरंतर सुरु असून यंदाही श्रद्येय बाबाजींच्या सानिध्यात साजरी करण्यात आली. त्यामध्ये सुरुवातीला कोरड्या रंगांची व त्यानंतर रंगारंग होळी महोत्सव साजरा करण्यात आले. भक्तीच्या या रंगाच्या उधळणीत भाविक चिंबचिंब झाले. त्यानंतर बोदरली समिती तर्फे महाप्रसादाचा आस्वाद भाविक भक्तांनी घेतला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add