Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल शहरातील स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा राजमुद्रा क्रिकेट संघाने जिंकली.

ताज्या बातम्या

यावल शहरातील स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा राजमुद्रा क्रिकेट संघाने जिंकली.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 4, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

सामना पाहण्या करीता प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.

यावल प्रतिनिधी : शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या मैदानावर रविवारी मोठ्या उत्साहात स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा पार पडली.या स्पर्धेचा अंतिम सामना यावल शहरातील केसरीनंदन क्रिकेट टीम व राजमुद्रा क्रिकेट टीम यांच्यात रंगला.राजमुद्रा क्रिकेट संघाने हा अंतिम सामना २७ धावांनी जिंकला.हा अंतिम सामना रविवारी संध्याकाळ पर्यंत रंगला होता.सामना पाहण्या करीता प्रेक्षकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.


यावल शहरातील बस स्थानकाजवळी मैदानावर स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील संपूर्ण सामने हे चुरशीचे ठरले होते तर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत यावल शहरातील राजमुद्रा क्रिकेट टीम व केसरी नंदन क्रिकेट टीम हे दाखल झाले होते. या दोन्हा संघात अंतिम सामना पार पडला. यात नाणेफेक जिंकून राजमुद्रा क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करीत निर्धारित १० षटकात पाच गडी गमावून १३५ धावा केल्या होत्या. तर सामना जिंकण्यासाठी केसरी नंदन क्रिकेट संघाला १३६ धावांचे लक्ष देण्यात आले होते. सायंकाळपर्यंत रंगलेल्या या सामन्यात केसरी नंदन संघ हा निर्धारित १० षटकात चार गडी गमावून केवळ १०८ धावा करू शकला. व हा सामना राजमुद्रा क्रिकेट संघाने २७ धावांनी जिंकला.

अंतिम सामन्याचा सामनावीर हा ३६ धावा करीत गोलंदाजी देखील एक बळी घेणारा सागर कोळी हा ठरला. तर या स्पर्धेतील प्रथम बक्षीस राजमुद्रा क्रिकेट संघ, व्दितीय बक्षीस केशरी नंदन क्रिकेट संघ तर तृतीय स्थानावर संघर्ष क्रिकेट संघ ठरला. अंतिम सामना पाहण्या करीता मैदानाच्या सभोवताली प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली होती. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वीते करिता कैलास भोईटे, रोहित सुतार, राम यादव, हर्षल यादव, विजय जावरे, महेंद्र माळी सह आदींनी परिश्रम घेतले.


यांनी गाजवली स्पर्धा.
या स्पर्धेतील विविध सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या मध्ये अक्षय भोईटे, कुणाल बारी, शेखर पटेल तर दोन सामन्यात सागर कोळी ठरला होता. तर मालिकावीर म्हणून स्पर्धे नाबाद ९९ धावा करणारा कुणाल बारी ठरला तर संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज म्हणुन त्यानेच सर्वाधीक बळी घेतले. तसेच स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज म्हणून अक्षय भोईटे याची निवड करण्यात आली या सर्वांना स्मृतीचिन्ह, चषक देऊन सन्मानित करण्यात आले.-पुर्ण-फोटो आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add