Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»‘हॉटेल सावन’ला भीषण आग;शहरापासून नजीक तरसोद फाट्याजवळ शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

ताज्या बातम्या

‘हॉटेल सावन’ला भीषण आग;शहरापासून नजीक तरसोद फाट्याजवळ शॉर्टसर्किटमुळे लाखोंचे नुकसान

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 5, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

सुदैवाने हॉटेलमधील पाच जिवंत गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली आहे.

जळगाव शहरापासून नजीक असलेल्या तरसोद फाट्याजवळ असलेल्या ‘हॉटेल सावन’ला काल सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने हॉटेलमधील पाच जिवंत गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरसोद फाट्याजवळील हॉटेल सावनमध्ये सध्या नूतनीकरणाचे (पीओपी) काम सुरू होते. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाले आणि आगीने रौद्र रूप धारण केले. हॉटेलचे छत पूर्णपणे ‘पीओपी’चे असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण हॉटेलला वेढले. धुराचे लोट लांबूनच दिसत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये काही कर्मचारी वास्तव्यास होते. मात्र, आग लागल्याचे तत्काळ लक्षात आल्याने सर्व कर्मचारी वेळीच बाहेर पडले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आगीच्या ज्वाळा किचनपर्यंत पोहोचण्यापूर्वीच तेथील पाच जिवंत गॅस सिलेंडर सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. महामार्गालगत हॉटेल असल्याने आणि सिलेंडरचा स्फोट झाला असता तर मोठी जीवितहानी झाली असती, मात्र कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच नशिराबाद आणि जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत हॉटेलमधील फर्निचर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले होते. या घटनेची नोंद नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add