Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»पिंप्राळा स्मशानभूमीसाठी सुविधा उपमहापौरांची नागरिकांच्या तक्रारीनंतर धडक भेट

जळगाव

पिंप्राळा स्मशानभूमीसाठी सुविधा उपमहापौरांची नागरिकांच्या तक्रारीनंतर धडक भेट

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 7, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा परिसरातील स्मशानभूमीत आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याच्या तक्रारीनंतर उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान स्मशानभूमीत शेड, सुरक्षा रक्षक कक्ष (वॉचमन रूम) तसेच अन्य मूलभूत सुविधांची उभारणी करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

पिंप्राळा उपनगर तसेच परिसरातील अनेक वसाहती आणि कॉलनींसाठी अंत्यसंस्कारासाठी पिंप्राळा स्मशानभूमी ही सर्वात जवळची आणि सोयीची जागा मानली जाते. मात्र गेल्या काही काळापासून या ठिकाणी देखभालीचा अभाव असल्याने विविध समस्या निर्माण झाल्या असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार उपमहापौर मनोज सुरेश चौधरी यांनी आज सकाळी पिंप्राळा स्मशानभूमीला भेट देत संपूर्ण परिसराची पाहणी केली. यावेळी नगरसेवक नरेंद्र पाटील, अमर जैन, कविता सागर पाटील, कविता किरण शिवदे, जाकीर पठाण, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, विजय चौधरी यांच्यासह अनेक नागरिक, कार्यकर्ते तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी स्मशानभूमीतील समस्या आणि आवश्यक सुविधा याबाबत उपमहापौरांचे लक्ष वेधले.

पाहणीदरम्यान परिसरात सुरक्षा व्यवस्थेचा अभाव, बसण्यासाठी बाकांची कमतरता, झाडाझुडपांची वाढ, तसेच नियमित साफसफाई न होणे अशा अनेक बाबी आढळून आल्या. यावर उपाय म्हणून स्मशानभूमीत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, वॉचमनसाठी रक्षक गृह उभारणे, अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करणे तसेच शेड उभारणे या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय परिसरात झाडे लावून स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे, वाढलेली काटेरी झुडपे हटवणे आणि नियमित साफसफाईसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्यासंदर्भातही संबंधित विभागाला सूचना देण्यात आल्या. या सर्व कामांची यादी तयार करून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती उपमहापौरांनी दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add