Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जळगावात आता घरगुती गॅस सिलिंडर महागला, ‘इतक्या’ रुपयाला मिळणार?

ताज्या बातम्या

जळगावात आता घरगुती गॅस सिलिंडर महागला, ‘इतक्या’ रुपयाला मिळणार?

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 7, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत.

जळगाव । मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा आता भारतावरही परिणाम होत आहे. भारतात एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६० रुपये आणि १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ११५ रुपयांनी वाढ केली आहे. नवे दर आज म्हणजेच ७ मार्चपासून लागू होतील.

जळगावला ८५८.५० रुपयांत मिळणारे स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर आता ९१८.५० रुपयांना मिळेल. यामुळे पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत ८५३ रुपयांवरून ९१३ रुपये होईल. तर, व्यावसायिक सिलिंडरची किंमत आता १,७६४ रुपयांवरून १८८३ रुपये होईल.घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत शेवटच्या वेळी ८ एप्रिल २०२५ रोजी ५० रुपयांनी वाढवण्यात आली होती. तेव्हापासून किमती स्थिर होत्या. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत गेल्या महिन्यात १ फेब्रुवारी रोजीच ५० रुपयांनी वाढवण्यात आली होती.

दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल आणि गॅसच्या किमतींबाबत चिंता वाढली आहे. परिणामी, भारतात एलपीजीच्या किमती वाढल्या असून पेट्रोलच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारत आपल्या एलपीजी गरजांचा मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण करतो. गेल्या आर्थिक वर्षात, देशाचा एकूण एलपीजी वापर अंदाजे ३१.३ दशलक्ष टन होता. तथापि, या एलपीजीपैकी फक्त १२.८ दशलक्ष टन देशांतर्गत उत्पादन झाले. उर्वरित गरजा पूर्ण करण्यासाठी, भारताला आखाती देशांसह इतर अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून गॅस आयात करावा लागला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add