Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तुल आणून विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

ताज्या बातम्या

मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तुल आणून विक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 8, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

सात संशयितांकडून आठ गावठी पिस्तुल आणि दहा जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.

जळगाव – मध्यप्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तुल आणून त्याची जळगावात विक्री करणाऱ्यांचा जिल्हापेठ पोलीसांनी पर्दाफाश केला. सात संशयितांकडून आठ गावठी पिस्तुल आणि दहा जीवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. गावठी पिस्तुलची विक्री करणारा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल आहे. सात पैकी तीन संशयित हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तर उर्वरीत चौघांनी केवळ दहशत माजविण्यासाठी त्यांनी गावठी कट्टे खरेदी केले. अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील इंडिया गॅरेज परिसरात राहणारा यश रामदास नन्नवरे (वय २७) हा गावठी पिस्तुल घेवून फिरत असल्याची माहिती जिल्हापेठपोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि अनिल वाघ यांना मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक गोपाल देशमुख, पोहेकॉ महेश महाजन, नरेश सोनवणे, संदीप परदेशी, भरत चव्हाण, राहूल पाटील, समाधान पाटील, तेजस मराठे, ईश्वर खवडे, नरेंद्र दिवेकर यांचे पथक तयार केले. या पथकाने यश नन्नवरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने तो कट्टा केशव सुनिल भालेराव (रा. वरणगाव, ता. भुसावळ) याच्याकडून घेतल्याचे सांगितले.नगरदेवळा येथे पीएसआयच्या घरावर पेट्रोल टाकून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात समाधान निकम हा फरार होता. तसेच त्याच्याविरुद्ध आठ गंभीर गुन्हे दाखल असून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तर केशव भालेराव हा देखील एका गुन्ह्यात पोलिसांना मिळून येत नव्हता. त्याचप्रमाणे गौरव साळवे हा पिंप्राळा येथील खूनाच्या गुन्ह्यातील संशयितांचा मित्र आहे.

केशव भालेराव याला खाक्या दाखविताच त्याने ते दोघ कट्टे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार समाधान बळीराम निकम (रा. अंजाळे, ता. यावल) याच्याकडून घेतले होते. त्यापैकी एक यशला आणि दुसरा कट्टा हा गौरव देविदास साळवे (रा. पिंप्राळा) याला विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार गौरव याला देखील अटक करुन त्याच्याकडून १ गावठी कट्टा ३ जीवंत काडतूस आणि (एमएच १९, सीएम १३१२) क्रमांकाची दुचाकी हस्तगत करण्यात आली.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add