Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»जळगावात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला.

ताज्या बातम्या

जळगावात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला.

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 9, 2026No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

एकलव्य क्रीडा संकुल येथे ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता या स्पर्धांना सुरुवात झाली.

जळगाव प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जळगावात महिलांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम पार पडला. युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरण, मेरा युवा भारत केंद्र जळगाव तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ASMITA Khelo India’ उपक्रमांतर्गत या स्पर्धा घेण्यात आल्या. एम. जे. महाविद्यालयातील एकलव्य क्रीडा संकुल येथे ८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता या स्पर्धांना सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरुवर्य प. वि. माध्यमिक शाळेच्या लेझीम पथकाने पारंपरिक पद्धतीने मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार स्मिता वाघ, महापौर दीपमाला काळे, आमदार सुरेश भोळे, खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे राजेश जाधव, एनएसएस जळगाव विद्यापीठाचे संचालक राजू गवारे, योगा असोसिएशनच्या शरयू विसपुते, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी, एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर तसेच स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ. रणजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमादरम्यान मल्लखांब, लाठीकाठी आणि विविध संरक्षणात्मक क्रीडा प्रकारांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. महिलांच्या आरोग्य, आत्मविश्वास आणि क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धा तीन वयोगटांत घेण्यात आल्या. त्यामध्ये १३ वर्षांखालील, १३ ते १८ वर्षे आणि १८ वर्षांवरील अशा गटांचा समावेश होता. १०० मीटर, २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या शर्यतींसह विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी स्पर्धकांची नोंदणी ‘अस्मिता खेलो इंडिया’ उपक्रमाच्या अधिकृत पोर्टलवर करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पदके प्रदान करण्यात आली.

स्पर्धेनंतर एम. जे. महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका शिल्पा बेंडाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे राजेश जाधव यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे व पदके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य क्रीडा मार्गदर्शक चंचल माळी यांनी केले.स्पर्धांचे परीक्षण कांचन विसपुते, विजय विसपुते, जितेंद्र शिंदे, सुमिधा सोनी, धीरज जावळे आणि नरेंद्र भोई यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक तसेच मेरा युवा भारत जळगाव केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्या. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेरा युवा भारतचे कार्यक्रम प्रमुख सुनील पंजे, साई संस्थेचे निलेश बाविस्कर, युथ क्लबचे नितीन नेरकर तसेच युवा स्वयंसेवक कमलेश सोनवणे, चेतन पाटील आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

स्पर्धांमध्ये १००, २०० आणि ४०० मीटर धावण्याच्या विविध गटांतील स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच संगीत खुर्ची, रस्सीखेच, चमचा-लिंबू आणि बुक बॅलन्स यांसारख्या फन गेम स्पर्धांमध्येही महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्व स्पर्धांमधील विजेत्या महिलांना पदके व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add