Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी बैलांचा मोर्चा काढणार…

ताज्या बातम्या

यावल शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी बैलांचा मोर्चा काढणार…

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 10, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

शहरातील शेतकरी नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढणार असल्याचे लेखी निवेदन यावल तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी,आणि पोलीस निरीक्षक यावल यांना देण्यात आले.

यावल प्रतिनिधी : शहरातील व परिसरातील मोकाट फिरणारे गुरे आणि सांड यांचा बंदोबस्त ८ दिवसात न झाल्यास शहरातील शेतकरी नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढणार असल्याचे लेखी निवेदन यावल तहसीलदार,नगरपरिषद मुख्याधिकारी,आणि पोलीस निरीक्षक यावल यांना देण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की यावल शहरात मोकाट गुरांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे,

मोकाट गुरांमध्ये सांड सुद्धा आहेत रस्त्याने बैलगाडी,मोटरसायकलने जाणाऱ्या- येणाऱ्यांच्या अंगावर हे सांड मागे सुटतात व बैलगाडीला बांधलेल्या बैलांना मारतात जखमी करतात सदरचे सांड हे बैलगाडीला धडक देऊन माणसांना सुद्धा जखमी करून आजूबाजूने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर सुद्धा धावून जातात,मागे यावल शहरात एका सांडमुळे एक व्यक्ती दगावला आहे,मोकाट सांडमुळे नागरिकांना इजा होण्याची दाट संभावना व्यक्त करण्यात येत आहे तरी यावल नगर परिषदेने ८ दिवसात शहरातील मोकाट गुरांचा आणि मोकाट सांडाचा बंदोबस्त न केल्यास यावल शहरातील शेतकरी यावल नगरपालिकेवर बैलांचा मोर्चा काढणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे निवेदनावर निलेश गडे,समाधान वाघ, गणेश सुरळकर,युवराज कोळी,दिपक वाघ,हर्षल कोळी, समीर खान, अयाज खान,मनोज पाटील, बापू कोलते व गावातील शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add