Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भुसावळात पं. प्रदीप मिश्रा दाखल; मंगळवारपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात

ताज्या बातम्या

भुसावळात पं. प्रदीप मिश्रा दाखल; मंगळवारपासून श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 11, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ येथुन जवळ असलेल्या अकलूद शिवारात मंगळवार पासून कथावाचक पं. प्रदीप मिश्रा यांच्या श्री शिवमहापुराण कथेला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातील तापी नगर परिसरातून तापी नदीपर्यंत आणि तेथून कथास्थळापर्यंत भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली.कथेसाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. भुसावळ मार्गे रावेरहून मध्यप्रदेशकडे आणि भुसावळहून यावलमार्गे गुजरातकडे जाणारी तसेच येणारी सर्व अवजड वाहतूक पुढील सात दिवस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.


कथास्थळी भव्य व्यवस्था
आयोजन समितीने भाविकांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कथास्थळी १३२ बाय ६०० फूट आकाराचा एक तसेच १०० बाय ६०० फूट आकाराचे तीन जर्मन हँगर डोम उभारण्यात आले आहेत. मुख्य व्यासपीठ ४० बाय ८० फूट आकाराचे आहे.

Oplus_131072

भाविकांच्या आसन व्यवस्थेसाठी सुमारे १५०० सिलिंग मंडप उभारण्यात आले असून भोजन व्यवस्थेसाठी ३८० सिलिंग मंडप तयार करण्यात आले आहेत. दररोज किमान एक लाख भाविकांना प्रसाद देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडपांमध्ये प्रखर प्रकाशासाठी मोठ्या दिव्यांची सोय करण्यात आली आहे.सोमवारी दुपारपासूनच भाविकांची गर्दी वाढू लागली. सायंकाळपर्यंत सहा हजारांहून अधिक भाविक कथास्थळी दाखल झाल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.


हेलिकॉप्टरचा कार्यक्रम रद्द
कथावाचक पं. प्रदीप मिश्रा हे ललितपूर-झांसी येथून रस्तेमार्गे येणार असल्याची माहिती सुरुवातीला होती. मात्र नंतर ते हेलिकॉप्टरने येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर तात्पुरते हेलिपॅडही तयार करण्यात आले होते.

Oplus_131072


दुपारी २ वाजता त्यांचे आगमन अपेक्षित असल्याने भाविकांनी दुपारी १२ वाजल्यापासून मैदानावर गर्दी केली होती. मात्र दुपारी ४ वाजता हेलिकॉप्टरचा दौरा रद्द करण्यात आला आणि पुन्हा रस्तेमार्गे येण्याचे नियोजन करण्यात आले. अखेर पं. प्रदीप मिश्रा रात्री ९ वाजता भुसावळात दाखल झाले.


पोलिसांकडून बंदोबस्ताचा आढावा

अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी कथास्थळी बंदोबस्ताची पाहणी केली. रस्ते, पार्किंग व अन्य ठिकाणी नेमलेल्या पोलिसांनी आपल्या नियुक्त ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. नेमणुकीच्या ठिकाणी कर्मचारी अनुपस्थित आढळल्यास थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


प्रशासनावर सुविधांबाबत टीका
आयोजन समितीने भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. कथास्थळी केवळ भुसावळ नगरपालिकेची फिरती टॉयलेट व्हॅन उपलब्ध झाली असून इतर नगरपालिकांकडून अपेक्षित सुविधा मिळाल्या नसल्याचे सांगण्यात आले.सोमवारीच सहा हजारांहून अधिक भाविक मंडपात दाखल झाल्याने काहींना पिण्याच्या पाण्याचीही अडचण भासल्याची तक्रार करण्यात आली.


वाहतूक नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग
कथा सुरू होण्यापूर्वी आणि समाप्तीनंतर भुसावळ–फैजपूर व यावल मार्गावर वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तापी नदी वाय पॉईंटवर तात्पुरते बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. मात्र रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत वाहतूक सुरळीत राहील. कथा सुरू झाल्यानंतर रस्त्यावर गर्दी कमी असल्यास परिस्थितीनुसार वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add