Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»श्रद्धेय श्री श्याम चैतन्य जी महाराज चैतन्य धाम येथे रंगपंचमी उत्सव व भव्य लेंगी नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

श्रद्धेय श्री श्याम चैतन्य जी महाराज चैतन्य धाम येथे रंगपंचमी उत्सव व भव्य लेंगी नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 11, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य जी बापू माझ्याकडून करून घेतात!.. आपल्या जीवनातील दुर्गुणांची होळी करा,आणि सात्विक जीवन जगा!.

जामनेर प्रतिनिधी : तालुक्यातील गुरुदेव सेवाश्रमच्या चैतन्य धाम येथे रंगपंचमी निमित्त भव्य लेंगी नृत्य स्पर्धा व धार्मिक कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण जिल्ह्यासह मराठवाडा व विदर्भातून महिला भगिनी, पुरुषवर्ग आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


या प्रसंगी संबोधन करताना चैतन्य धामचे निर्माते श्रद्धेय श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी अत्यंत भावनिक शब्दांत सांगितले की, “मी काहीच करत नाही… ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य जी बापू माझ्याकडून करून घेतात.” त्यांच्या या अमृत वचनांनी उपस्थित भाविक भक्तांचे डोळे पाणावले. चैतन्य धाम उभे राहण्यामागे ब्रह्मलीन परमपूज्य लक्ष्मण चैतन्य जी बापू यांचेच आशीर्वाद होते आणि ते सदैव राहतील, अशी सद्भावना त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुदेव सेवाश्रमचे सचिव श्री रविंद्र जी महाजन यांनी केले. भव्य लेंगी नृत्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री धाडी सर, श्री उत्तम जी राठोड आणि श्री विठ्ठल जी जाधव यांनी जबाबदारी पार पाडली.


या कार्यक्रमाला विविध तांड्यांचे नायक, कारभारी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच ८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून संघर्षमय कार्य करणाऱ्या सौ. जयश्री संदीप राणे यांचा श्रद्धेय श्री श्याम चैतन्य जी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.रंगपंचमीच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने भाविकांमध्ये भक्ती, उत्साह आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण केले. आभार श्री किशोर नाईक यांनी मानले!..

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add