Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»50 पन्नासहुन अधिक गरजू विद्यार्थ्यांना मिळणार UPSC, MPSC, JEE,NEET परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण

ताज्या बातम्या

50 पन्नासहुन अधिक गरजू विद्यार्थ्यांना मिळणार UPSC, MPSC, JEE,NEET परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 11, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

निवास, भोजनासह पुस्तके ही मिळणार विनामूल्य; सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व नोबेल फाउंडेशनचा प्रकल्प

जळगाव । “जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा”. संत तुकारामांच्या अभंगाच्या या ओवी खऱ्या अर्थाने जगण्याचे कार्य फैजपूर येथील संत परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी आता खानदेशातील पन्नासहून अधिक होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना निवासी स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण निशुल्क दिले जाणार आहे.

जळगाव ,धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीपासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी थांबावे लागू नये तसेच यांच्या जीवनात यशाचा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी फैजपूर येथील प्रसिद्ध संत परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण पाऊल टाकलेले आहे.आपल्या आध्यात्मिक मार्गदर्शनाने लाखो लोकांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारे जनार्दन हरी जी महाराज शिक्षण क्षेत्रात गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत.

जळगाव येथील शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था नोबेल फाउंडेशन आणि सतपंथ चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांना यूपीएससी,एमपीएससी तसेच आयआयटी प्रवेशासाठी जेईई, मेडिकल प्रवेशासाठी नीट या परीक्षांचे निशुल्क मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या निवासाची तसेच भोजनाची सुद्धा निशुल्क व्यवस्था सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे करण्यात आलेले आहे.नुकताच फैजपूर येथे निष्कलंक धाम येथे पार पडलेल्या समारंभात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक प्रवीणभाई पटेल यांनी केली आपल्या वाढदिवसानिमित्त या प्रकल्पासाठी ११ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.

यावेळी महामंडलेश्वर प.पू.गुरुवर्य श्री.जनार्दन हरिजी महाराज राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजयजी सावकारे, रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे, प. पू. गुरुवर्य श्री मानेकर बाबा शास्त्री, प.पू.महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज प.पू.गुरुवर्य श्री गोपाल चैतन्य महाराजजी, प. पू.गुरुवर्य शास्त्री स्वामी श्री अनंतप्रकाश दासजी,प.पू.प्रविणदास जी महाराज,प.पू.प्रभू कन्हैया दासजी,शास्त्री भक्ती प्रिय दास जी,ह.भ.प.नितीन महाराज मलकापूर,ह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर, नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, कॅप्टन राजेंद्र सिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते.

अशी असणार निवड प्रक्रिया –
पदवीला असणारे तसेच पदवीत्तर विद्यार्थ्यांसाठी आणि दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाईल.
अशी असेल निवड प्रक्रिया-
परीक्षा- ११ एप्रिल २०२६
केंद्र – जळगाव धुळे नंदुरबार
नोंदणी साठी- nobelfoundation.co.in- 9922004193 या क्रमांकावर संपर्क करावा.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add