Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी;

ताज्या बातम्या

मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 12, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क…!

मुंबईतील महाराष्ट्र विधानभवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा मेल पाठवण्यात आला होता.

धमकीचा ई-मेल मिळताच पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या. सुरक्षेच्या कारणास्तव विधानभवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. तपास पूर्ण होईपर्यंत काही काळासाठी कर्मचाऱ्यांना बाहेरच थांबवण्यात आले होते आणि कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराची तपासणी केली. प्राथमिक तपासणीनंतर सुरक्षा तपास पूर्ण करत हळूहळू कर्मचाऱ्यांना पुन्हा आत सोडण्यात आले.

सध्या राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री तसेच अनेक व्हीआयपी व्यक्ती विधानभवन परिसरात येत-जात असतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी कोणताही धोका टाळण्यासाठी खबरदारी घेत परिसरात शोध मोहीम सुरू ठेवली आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना संपूर्ण तपास होईपर्यंत अधिवेशन चालवू नये, अशी मागणी केली आहे. ही धमकी केवळ भीती निर्माण करण्यासाठी आहे की यामागे काही गंभीर कट आहे, याचा सखोल तपास झाला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.पोलिसांकडून सध्या धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात असून सायबर पथकही या प्रकरणाचा तपास करत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add