Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»शेजारी राहणाऱ्या मामाने चार वर्षीय भाचीवर केला अत्याचार

ताज्या बातम्या

शेजारी राहणाऱ्या मामाने चार वर्षीय भाचीवर केला अत्याचार

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 12, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना

एरंडोल – शेजारी राहणाऱ्या मामाने चार वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अत्याचार करणाऱ्या नराधमासह एरंडोल पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात चार वर्षीय चिमुकली वास्तव्यास असून त्यांच्या घराशेजारीच तीचा मामा देखील वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास चिमुकली घरी एकटी असल्याचे पाहून संशयिताने तीला स्वतःच्या घरी नेले. त्याठिकाणी चिमुकलीसोत घृणास्पद कृत्य करीत तिच्यावर अत्याचार केला काही वेळानंतर चिमुकल्या मुलीची आई घरी आल्यानंतर तिला मुलगी दिसून न आल्याने तीने आजूबाजूला असलेल्या घरांमध्ये तिचा शोध यावेळी तिला भावाच्या घरात चिमुकली मिळून आली. दरम्यान, चिमुकलीला घेवून तीची आई, वडीलांनी तात्काळ एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याठिकाणी त्यांनी तक्रार दिली असून त्यानुसा संशयित मामा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयिताला अटक देखील करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर सुमारे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याप्रसंगी डीवायएसपी विनायक कोते यांनी आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आदोलन मागे घेण्यात आले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add