Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»तरुणीचा पाठलाग करुन माझ्याशीच लग्न कर असे म्हणत विनयभंग;

ताज्या बातम्या

तरुणीचा पाठलाग करुन माझ्याशीच लग्न कर असे म्हणत विनयभंग;

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 12, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

लहान भावाला जीवे मारण्याची धमकी!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – वेळोवेळी तरुणीचा पाठलाग करुन तिला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच तरुणीला मी तुझे लग्न दुसरीकडे होवू देणार नाही जर तू केले तर तुला व तुझ्या लहान भावाला मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. ही घटना फेब्रुवारी २०२५ ते दि. ८ मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी संशयित सलमान सगीर काकर (रा. पंचशीलनगर) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात १९ वर्षीय तरुणी वास्तव्यास असून त्या तरुणीचा फेब्रुवारी २०२५ पासून संशयित सलमान काकर हा पाठलाग करीत होता. दरम्यान, दि. ८ मार्च रोजी संशयिताने त्या तरुणीला शामा फायरजवळ थांबवले आणि त्याचा हात तरुणीच्या खांद्यावर ठेवला.

यावेळी तो तरुणीला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर असे म्हणू लागला. त्यानंतर मी तुझे दुसरीकडे लग्न होवू देणार नाही, जर तू केले तर तुला आणि तुझ्या लहान भावाला जीवेठार मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली. तरुणीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितल्यानंतर त्यांनी लागलीच एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश वंजारी हे करीत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add