Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भारतासह जगासाठी चिंता वाढवणारी बातमी जे घडायला नको होतं, तेच घडलय !

ताज्या बातम्या

भारतासह जगासाठी चिंता वाढवणारी बातमी जे घडायला नको होतं, तेच घडलय !

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 12, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

अशातच भारतासह सगळ्या जगासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे.

जळगाव । इराण-अमेरिका संघर्ष आणि मध्य पूर्वेतील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे भारतात अनेक देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. अशातच भारतासह सगळ्या जगासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय तेलबाजारात पुन्हा मोठी अस्थिरता दिसून येत असून गुरुवारी कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेली आहे. ब्रेंट क्रूड सध्या सुमारे १००.५० डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

स्ट्रेट ऑफ होर्मुझ परिसरात बुधवारी तेलवाहू टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर जागतिक बाजारात चिंता वाढली आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात जागतिक तेल वाहतूक होते. त्यामुळे या भागातील तणावामुळे तेल आणि एलपीजी पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळपासूनच कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली.

यापूर्वी सोमवारी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ११५ डॉलरपर्यंत पोहोचली होती. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध लवकर संपण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर बाजारात थोडी स्थिरता आली आणि किंमत ८५ डॉलरपर्यंत खाली आली होती. परंतु पुन्हा वाढत्या तणावामुळे तेल दरांनी १०० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

दरम्यान, इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाचा आज तेरावा दिवस आहे. तणाव कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याने जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता वाढली आहे. सोशल मीडियावर तेलवाहू जहाजांवर हल्ल्यांचे आणि आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या जहाजांचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.तेलाच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने पुढील आठवड्यात स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमधून सुमारे १७२ मिलियन बॅरल कच्चे तेल बाजारात सोडण्याची घोषणा केली आहे. तरीदेखील आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढतच असल्याचे दिसत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add