Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»भुसावळात मराठी भाषा गौरव संकल्पनेचा प्रारंभ ,नगराध्यक्ष गायत्री ताई भंगाळे यांचा पुढाकार

ताज्या बातम्या

भुसावळात मराठी भाषा गौरव संकल्पनेचा प्रारंभ ,नगराध्यक्ष गायत्री ताई भंगाळे यांचा पुढाकार

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परदेशातील संकल्पना मराठमोळ्या पद्धतीचे स्वरूप देत राबवली स्वदेशात.

भुसावळ प्रतिनिधी : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त परदेशातील संकल्पना मराठमोळ्या पद्धतीचे स्वरूप देत राबवली स्वदेशात. स्वतःच्या गावात .स्वतःच्या वार्डात…परदेशात साहित्यिक ,कला व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तीच्या घरासमोर गेटवर निळ्या रंगात जन्म मृत्यूची उल्लेख असलेली त्यांच्या नावाची पाटी लावली जाते. त्या वस्तूची हेरिटेज वास्तू म्हणून गणना केली जाते. ऐतिहासिक वारसा जतन केला जातो. या परदेशी संकल्पनेला स्वदेशी रूप देऊन मराठमोळ्या पद्धतीने भुसावळ येथे राबवली.

त्याची सुरुवात मराठी भाषा गौरव पंधरवाडा व महिला दिना निमीत्त सुप्रसिद्ध साहित्यिक सीमा भारंबे यांच्या निवासस्थानाला ही पाटी लावून शुभारंभ केला आहे . कार्यक्रमाचे संकल्पना आणि नियोजन समन्वयक प्रा उत्तम सुरवाडे यांनी केले. यावेळी कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. तसेच ललीता चौधरी,सिमा भारंबे,सायली चौधरी,प्रा.उत्तम सुरवाडे,यांची उपस्थिती होती.
या उपक्रमांतर्गत सांगवी येथील निवासस्थानाला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे, फैजपुर येथील कविवर्य भानू चौधरी यांच्या निवासस्थानाला.

तसेच टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील साहित्यिकांपर्यंत ही चळवळ पोहोचवली जाईल.असा निर्धार भुसावळ येथील साहित्यिक बाबा साहेब के नारखेडे , मधुसाळी , नाट्य कलावंत श्रीकांत जोशी, विरेंद्र पाटील,राजेंद्र जावळे,जगदीश पाटील, काशीनाथ भारंबे, रमाकांत भालेराव यांच्या सह भुसावळ शहरातील इतर लेखक कलावंत यांच्या घरावर अशा पाट्या लावल्या जाणार आहे असा निर्धार प्रा.उत्तम सुरवाडे यांनी केला आहे . हा एक मराठी भाषेचा गौरव असल्याचे बोलले जाते .

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add