Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»मधुकरराव चौधरी केमिस्ट्री अँप्टीतुड टेस्ट पारितोषिकाचे थाटात वितरण

ताज्या बातम्या

मधुकरराव चौधरी केमिस्ट्री अँप्टीतुड टेस्ट पारितोषिकाचे थाटात वितरण

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

तापी परिसर विद्या मंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आयोजित,

फैजपूर प्रतिनिधी : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित, धनाजी नाना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आयोजित, लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ऍप्टिट्यूड टेस्ट 2025-26 चा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 11/03/ 2026 रोजी संपन्न झाला. या परीक्षे मध्ये एकूण 25 महाविद्यालतील 337 विध्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.एस. के. चौधरी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून

मा.प्रा. डॉ. गुणवंत हरी सोनवणे चेअरमन- रसायनशास्त्र अभ्यास मंडळ क.ब. चौ.उ.म.वि. जळगांव त्यासोबत तापी परिसर विद्यामंडळाचे चेअरमन- श्री लीलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव- श्री. मुरलीधर टी. फिरके, सहसचिव-श्री.नंदकुमार आसाराम भंगाळे, कार्यकारी सदस्य माजी प्राचार्य डॉ. एस.एस.पाटील, मा.श्री. संजय दादा चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र बी. वाघुळदे, उपप्राचार्य प्रा. एम. झेड. सुरवाडे व प्रा. कल्पना पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी भंगाळे व प्रा.नाहीदा कुरेशी यांनी केले. तर प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. योगेश तायडे यांनी केले. सदरील कार्यक्रमांमध्ये कु. नंदा आनंदा बाविस्कर श्री.वि.एस. नाईक कॉलेज, रावेर यांनी लोकसेवक मधुकरराव चौधरी केमिस्ट्री ऍप्टिट्यूट टेस्ट याचे विशेष महत्त्व आहे

व ही परीक्षा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे असे तिने आपल्या मनोगतातून सांगितले. त्याचप्रमाणे स्थानिक समन्वयक डॉ.जयंत प्रल्हाद नेहेते सरदार वल्लभभाई पटेल कॉलेज, ऐनपुर यांनी आपल्या मनोगतातून स्वतः विद्यार्थी स्वतःचे मूल्यांकन करता असे नमूद केले.सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.गुणवंत सोनवणे यांनी आपल्या भाषणात रसायनशास्र विषय हा रोजगार देणारा व व्यवसायभिमुक आहे या परीक्षेमध्ये खालील विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री. एस. के. चौधरी व सर्व संचालक मंडळ, तापी परिसर विद्या मंडळ व विभाग प्रमुख प्रा. डी. बी. तायडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

1. साहिल बापूराव पाटील आर. एल. कॉलेज, पारोळा ( देशात प्रथम क्रमांक),
2. कु. रुपेश गंगाधर पाटील सि. गो. पाटील कॉलेज, साक्री( देशात द्वितीय क्रमांक ),
3.कु. वैष्णवी गजानन मोलगे आर. डी. आर. के.कॉलेज, बडनेरा,जिल्हा अमरावती ( देशात तृतीय क्रमांक).
माननीय श्री.एस. के. चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये असे म्हटले की,LMC CAT परीक्षेचा उपयोग राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेत आत्मविश्वास वाढवण्यासाठी होईल.


कार्यक्रमाचे आभार प्रा. शेरसिंग पाडवी यांनी मानले सदरील कार्यक्रमासाठी प्रा. ए. के. पाटील,डॉ. राकेश तळेले, डॉ. हरीश तळले, डॉ.मच्छिन्द्र पाटील, प्रा. अचल भोगे,प्रा. विकास वाघुळदे, निलेश पाटील, हंशाली पाटील,चैताली पाटील, सुजित भाट, पूजा महाजन, श्री जितेंद्र चौधरी ,श्री अरुण सैंदाणे व श्री.सिद्धार्थ तायडे यांनी परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add