Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»रावेर तालुक्यातील नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

ताज्या बातम्या

रावेर तालुक्यातील नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 13, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्र परिसरात घडली होती घटना

जळगाव प्रतिनिधी :- रावेर तालुक्यातील गारखेडा उपकेंद्र परिसरात १० मार्च रोजी नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी  गंभीर दखल घेत जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी गारखेडा आरोग्य उपकेंद्रातील कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटील यांना सेवेतून कमी करण्याची कारवाई केली आहे.

रावेर तालुक्यातील गारखेडा आरोग्य उपकेंद्रात १० मार्च  रोजी मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास एका महिलेची प्रसूतीची घटना घडली. रुकसाना अजित तडवी या तिसऱ्या खेपाच्या गरोदर महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर संबंधित आशा सेविकेने तत्काळ गारखेडा येथील उपकेंद्रात दाखल केले. उपकेंद्रात कार्यरत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकेला याबाबत दूरध्वनीद्वारे तात्काळ कळविण्यात आले होते. मात्र नंदा कडू पाटील या मुख्यालयी राहत नसल्याने त्या वेळेत उपकेंद्रात उपस्थित राहू शकल्या नाहीत.

दरम्यान, गरोदर महिलेच्या प्रसूती वेदना वाढत असल्याने आणि आरोग्य सेविका उपकेंद्रात पोहोचण्याआधीच प्रसूतीची वेळ आल्याने तेथे उपस्थित असलेल्या आशा सेविकेने आपल्या प्रशिक्षणाचा उपयोग करून उपकेंद्रात उपलब्ध असलेल्या आवश्यक वैद्यकीय साधनसामग्रीच्या सहाय्याने अत्यंत दक्षतेने मध्यरात्री सुमारे १ वाजता प्रसूती प्रक्रिया पार पाडली. सदर आशा सेविकेने ANM प्रशिक्षण घेतलेले असल्याने प्रसूती सुरक्षितरित्या पार पडली.

प्रसूतीनंतर नवजात बाळ रडत नसल्याचे लक्षात येताच आई व बाळाला तात्काळ पुढील उपचारासाठी पाल ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले. पाल ग्रामीण रुग्णालयात बाळावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी सावदा येथे हलविण्यात येत असताना दुर्दैवाने सावदा येथे पोहोचण्यापूर्वीच रस्त्यात नवजात बाळाचा मृत्यू झाला.

ही घटना अत्यंत दुर्दैवी व गंभीर असून जिल्हा परिषद जळगाव प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, प्रथमदर्शनी चौकशीत कंत्राटी आरोग्य सेविका नंदा कडू पाटील या मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य सेवेवर प्रश्न निर्माण झाल्याची बाब समोर आल्याने त्यांच्यावर सेवेतून कमी करण्याची कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व तत्पर राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add