Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»रोकडा हनुमान व्यायाम शाळा आयोजित सुरु असलेल्या खाटू नरेश श्री श्याम बाबांची महाकथा सत्संग

ताज्या बातम्या

रोकडा हनुमान व्यायाम शाळा आयोजित सुरु असलेल्या खाटू नरेश श्री श्याम बाबांची महाकथा सत्संग

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 15, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

रावेर येथील कथेत खाटू श्याम बाबा जन्मोत्सव साजरा 

रावेर प्रतिनिधी : येथील रोकडा हनुमान व्यायाम शाळा आयोजित सुरु असलेल्या खाटू नरेश श्री श्याम बाबांची महाकथा सत्संग अमृत महोत्सवाच्या चतुर्थ दिनी भगवान श्री खाटू श्याम बाबा यांच्या जन्मोत्सव साजरा करण्यात आले.कार्तिक शुक्ल एकादशी च्या दिवशी भगवान श्री खाटू श्याम बाबा यांचे प्रागटय भीम पुत्र घटो तकच्च व माता मोरवी यांच्या घरी हिडिंबा वनात झाले होते. आणि

लहानपणापासून भगवान श्री कृष्णा च्या शरणी जाऊन आशीर्वाद प्राप्त करून घोर तप करण्याचे वरदान प्राप्त करून बाल्यावस्थेत राक्षस कुळात जन्मलेले बरबरीक नावाने ओळखले जाणारे खाटू श्याम बाबा यांचे बालपण नित्य ईश्वर भक्तीत तल्लीन होते असे रावेर येथील रोकडा हनुमान व्यायाम शाळेच्या प्रांगणात सुरु असलेल्या श्री खाटू श्याम बाबा महा कथेच्या चतुर्थ दिनी जळगाव येथील कथावाचक कृष्ण प्रेमी श्री मनोजचंद्र महाराज जी यांनी आपल्या रसाळ अमृत वाणीतून श्री खाटू श्याम बाबा यांच्या बाललीला चे वर्णन केले. यावेळी शेकडो भाविक भक्तांनी हा जन्मोत्सव आनंद व भक्तिमय वातावरणात साजरा केला.

ही महाकथा मिती फाल्गुण कृ.६ दि ९ मार्च पासून सुरु असून रोज सायंकाळी ७ ते १० पर्यंत असते. दररोज मंगल आरती सकाळी ८ वाजता व श्री श्याम दरबार दिव्य दर्शन त्याच बरोबर सातव्या दिवशी अखंड ज्योत दर्शन आणि छप्पन भोग महाआरती तसेच दि १६ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान काल्याचे कीर्तन, महाप्रसाद व संध्याकाळी भव्य मिरवणूक काढून कथेची सांगता करण्यात येणार आहे.

या महाकाथेला पवन व्यायाम शाळा, पंचमुखी हनुमान व्यायाम शाळा, जय सियाराम दुर्गा उत्सव मंडळ, प्रताप व्यायाम शाळा, अंबिका व्यायाम शाळा, प्रशिक व्यायाम शाळा, साई मंदिर परिसर, पूर्ण रामेश्वर महादेव मंदिर परिसर, श्री छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा, महात्मा फुले व्यायाम शाळा, शिवराणा व्यायाम शाळा, वीर भगत सिंग व्यायाम शाळा, साक्री माता मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर परिसर, चैतन्य साधक परिवार व पंचक्रोशीतील सर्व मंडळी संत भूमी रावेर यांचे सहकार्य लाभले.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add