Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»यावल शहरात वैकुंठ यात्रा तथा अंतयात्रेचे वाहन खरेदी करा

ताज्या बातम्या

यावल शहरात वैकुंठ यात्रा तथा अंतयात्रेचे वाहन खरेदी करा

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraMarch 18, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

नगरसेवक सागर चौधरी यांची जनहिताची मागणी.

यावल प्रतिनिधी : शहरात शासकीय स्तरावर गोरगरीब जनतेसाठी मृतदेह वाहून नेणारे कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने वैकुंठ यात्रेसाठी तथा अंतयात्रेचे वाहन खरेदी करण्याची जनहिताची मागणी नगरसेवक सागर चौधरी यांनी यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षां छायाताई अतुल पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली.

दि.१७ रोजी यावल नगरपरिषद यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,यावल शहरात गोरगरीब घरातील मयत झालेल्या व्यक्तींना स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी म्हणजे त्यांची वैकुंठ धाम यात्रा / अंतयात्रेचा प्रवास सुखकर होण्यासाठी शासकीय स्तरावर कोणतीही शववाहिका उपलब्ध नसल्याने गोर गरीब जनतेला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो व अनेक वेळा त्यांना आर्थिक अडचणी येतात म्हणूनशहरातील नागरिकांची सोय व मानवतेच्या दृष्टीने,जनहितासाठी नगरपरिषदेकडून एक शववाहिका उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक झाले आहे.यावल नगरपरिषद कडून शववाहिका खरेदी करण्यात आली तर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.


म्हणून यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षां सौ.छायाताई अतुल पाटील,मुख्याधिकारी निशिकांत गवई की यांनी शहरासाठी अंत्ययात्रेसाठी एक वाहन / गाडी खरेदी करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे अशा मागणीचे लेखी निवेदन सागर सुनील चौधरी यांनी यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षां छायाताई पाटील यांच्याकडे दिले.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्वीकृत सदस्य अतुल वसंतराव पाटील व त्यांचे प्रभागातील काही समर्थक, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

एसटी महामंडळाच्या सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 18, 2026

यावल सातपुडा पर्वतरांगांत वणवा लावताना तरुणाला रंगेहाथ पकडले ; यावल वनविभागाची कारवाई

March 18, 2026

राज्यातील २१ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये अलर्ट, जळगावात काय स्थिती?

March 18, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add