
रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि तत्परता दाखवली
भुसावळ प्रतिनिधी : रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दक्षता आणि तत्परता दाखवली आहे. भुसावळ विभागातील सुविधा विभागात कार्यरत तिकीट तपासणी कर्मचारी सी. पी. बाढे यांनी १५ मार्चरोजी तिकीट तपासणीदरम्यान उल्लेखनीय कामगिरी बजावली. सतर्क तपासणीद्वारे बढे यांनी तिकीटविरहित प्रवासाच्या ७८ गुन्ह्यांची नोंद करत २ लाख ५७ हजार ,६५० दंड वसूल केला.
नियमित व कडक तिकीट तपासणी मोहिमेमुळे तिकीटविरहित प्रवासाला आळा बसण्यास मदत होते वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना योग्य आसनव्यवस्था आणि आरामदायी प्रवासाचा लाभ मिळतो. अशा कारवाईमुळे गाड्यांमध्ये शिस्त राखली जाते एकूणच प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा होते. बढे यांची ही कामगिरी व्यावसायिक अंमलबजावणीची परिणामकारकता दर्शविते रेल्वे नियमांचे पालन सुनिश्चित करताना रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची निष्ठा अधोरेखित करते.


