Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»राजकारण»उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रियेला सुरुवात

राजकारण

उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रियेला सुरुवात

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 25, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

निवडणुकीसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी इच्छुकांची महापालिकेत मोठी गर्दी

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येत असल्याने निवडणुकीसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी इच्छुक उमेदवारांची जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत मोठी गर्दी होत आहे. विशेषतः महापालिकेची थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापराचा दाखला तसेच शासकीय ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी ६१८ जणांनी नामनिर्देशन अर्ज विकत घेतले, मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही. पहिल्या दिवशी ७७७ अर्जाची विक्री झाली होती. दोन्ही दिवस मिळून १३९५ अर्ज विक्री झाले आहेत.

दुसरीकडे निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेले ‘कर थकबाकी नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी बुधवारी पाचव्या मजल्यावरील मिळकत वसुली विभागात प्रचंड गोंधळ होता. इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे महापालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे. यात मालमत्ता कर, पाणीपट्टी व अन्य शुल्कांचा समावेश होतो. याशिवाय उमेदवार शासकीय ठेकेदार नसावा तसेच स्वतःच्या निवासस्थानी शौचालयाचा वापर करत असल्याचा दाखला सादर करणेही आवश्यक आहे. या तिन्ही महत्त्वाच्या दाखल्यांसाठी सध्या संबंधित विभागांबाहेर इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येत असल्याने इच्छुकांची पावले महापालिकेकडे वळू लागली आहेत. पण तांत्रिक अडचणींमुळे दाखले मिळत नाहीत. दाखले वितरित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या खिडक्यांची संख्याही अपुरी पडत असून, महापालिकेने तातडीने अतिरिक्त कर्मचारी आणि खिडक्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काच वेळी शेकडो अर्ज आल्याने वसुली विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आला आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add