Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»ब्रम्हलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीं

ताज्या बातम्या

ब्रम्हलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीं

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 26, 2025No Comments3 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

संतांचे जीवन परोपकारी आणि कल्याणकारी असते महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज

पाल.रावेर प्रतिनिधी : ब्रम्हलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीं सारख्या दिव्य दैवी आत्म्यांचे स्मरण केल्याने हृदय आनंदाने भरून जाते. बापूजीनीं चैतन्य साधक परिवार ची स्थापना करून देशभरातील लाखो भक्तांना आध्यत्मिक जीवन जगण्याची कला अवगत करून उद्धार केला. पूज्य बापूजी स्वतः भौतिक वस्तू चा त्याग करून ईश्वरिय शक्ती प्राप्त करण्यासाठी आणि जनकल्याणकरिता विराट संकल्प करीत साक्षात परमेशवराचे दर्शन प्राप्त करून अज्ञानरूपी अंधःकारात भरकलेल्या मानवी जीवाला ज्ञानाच्या प्रकाशात आणले.

आज त्यांच्या सानिध्यात पूज्य बाबाजी माता नर्मदेची प्रदक्षिणा करण्याचा कठीण संकल्प पूर्ण करत आहेत. यापेक्षा विशेष श्रद्धांजली असू शकत नाही. बापूजींनी साधकाला आध्यात्मिक मार्ग दाखवला आणि आपण सतत त्या मार्गाचे अनुसरण करत आहोत हीच संताची ओळख असते म्हणून जीवन परोपकारी आणि कल्याणकारी असते. संत आपल्याला जागृत करण्याचे काम करतात. तसेच सर्व संत हे पाल आश्रमाशी समर्पित आहेत. बाबाजींच्या उपस्थितीत पूज्य बापूजींच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही सर्वजण एकत्रितपणे चैतन्य साधक परिवारात जे कार्य करत आहात ते सर्वात मोठे यश आहे. सदगुरु आपल्याला परिपक्व बनवतात. बापूजींनी साधक निर्माण करून आपल्याला ज्ञानी बनवले. बापूजींचे सेवक व्हा आणि बापूजींचे स्वप्न साकार करा असा संदेश सतपंथ रत्न स्वामी श्री जनार्दन हरी जी महाराज यांनी पाल वृंदावन धाम आश्रमात दि २५ डिसेंबर रोजी ब्रह्मलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या १६ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी विराजमान होऊन चैतन्य साधक परिवाराला दिले.

सालाबादाप्रमाणे यंदा ही श्री वृंदावन धाम पाल आश्रमात ब्रम्हलीन परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजीं च्या पुण्यतिथी निमित्त देशभरातून किमान पंधरा हजाराच्या आसपास चैतन्य साधक तसेच भाविकांनी श्री हरिधाम मंदिरात स्थित परम पूज्य बापूजींच्या समाधी स्थळी दर्शन घेतले.या दोन दिवसीय महोत्सवात पूज्य बापूजीच्या पुण्यतिथी महोत्सव सह श्री हरिधाम मंदिर वर्धापन दिन, तसेच सदगुरु संत श्री महादेव चैतन्य उर्फ दगडू जी बापू जयंती महोत्सव साजरा करण्यात आले. दि २४ डिसेंबर रोजी रात्री ८ ते १० वाजेपर्यंत भजन संध्या तसेच दीपोत्सव साजरा करण्यात आले. त्यानंतर दि २५ डिसेंबर रोजी परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापुजींच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी ५ वाजेपासून समाधी स्थळी चरण पादुका पूजन, अभिषेक व आरती करण्यात आली. त्यानंतर १० वाजेपासून या पुण्यतिथी महोत्सवात आलेल्या संत, महंत, आणि महामंडलेश्वर यांचे श्रद्धावचनाचा भाविकांना लाभ मिळाले.

तसेच सध्या माँ नर्मदा पैदल परिक्रमा करीत असलेले आश्रमाचे विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या लाईव सत्संग अमृताचा लाभ भाविकांनी घेतला. या पूज्य बापूजीच्या पुण्यतिथी महोत्सवात मुंबई समितीतर्फे रावेर ते पाल पैदल दिंडी दर वर्षाप्रमाणे यंदाही शेकडो च्या संख्येने दाखल झाली. गेल्या काही दिवसापासून या महोत्सवाची पाल सह विविध समिती तर्फे श्रधेय बाबाजीच्या मार्गदर्शनातून ब्रम्हचारी संताच्या सानिध्यात जय्यत तयारी करण्यात आली त्या बद्दल आभार व्यक्त करण्यात आले.पाल आश्रम दिनदर्शिकाचे लोकार्पण करण्यात आले.तसेच पाल ग्राम समिती तर्फे निरंतर सुरु असलेल्या महाप्रसादाचा भाविकांनी घेतला.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add