Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पब्लिक”चा ढोंगी साधूंना ‘महाप्रसाद’!

ताज्या बातम्या

पब्लिक”चा ढोंगी साधूंना ‘महाप्रसाद’!

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 26, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

चार साधू ताब्यात लुटीचा प्रकार उघड

अमळनेर प्रतिनिधी : साधूंच्या वेशात शहरात दाखल होऊन दुकानदारांना विविध सुगंध व औषधांचा वास देत गुंगी आणून पैसे व वस्तू लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीचा तरुणांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला. नागरिकांनी या ढोंगी साधूंना चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले, त्यानंतर पोलीस ठाण्यातही त्यांना ‘महाप्रसाद’ देण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ रोजी अमळनेर शहरात चार ते पाच साधूंच्या वेशातील टोळी दाखल झाली होती. धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरात समर्थ ट्रेडिंगचे मालक जितेंद्र पाटील यांच्याजवळ हे साधू गेले. त्यांनी टिळा लावून कशातरी सुगंधाच्या किंवा गुंगी आणणाऱ्या औषधाच्या नावाखाली दुकानदाराला वश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका साधूने बळजबरीने दुकानात प्रवेश करत थेट गल्ल्यात हात घातला व पाच हजार रुपयांची रोख रक्कम तसेच काही वस्तू लांबवल्या.

ही बाब लक्ष्मी प्रिंटिंगचे संचालक अतुल भदाणे यांच्यासह सनी पाटील, कार्तिक चौधरी, मेहुल चौधरी आणि शेषनाथ बागुल यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुकानदाराला सावध केले. साधूंना पकडून त्यांनी लुबाडलेली रक्कम व वस्तू परत काढून दिल्या. या प्रकाराची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली आणि संतापलेल्या नागरिकांनी ढोंगी साधूंना चोप दिला.


घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित बहिरूपी साधूंना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हे चारही साधू गुजरात येथील असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून अशा प्रकारे भोळ्या-भाबड्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, काही ढोंगी साधू नागरिकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत भविष्य, उपाययोजना, मोहिनी घालणे अशा प्रकारच्या आमिषाने घरात किंवा दुकानात प्रवेश करून लूटमार करतात. कुंभमेळा, पायी वारी, दिंडी, नवनाथ किंवा गडावर जाण्याच्या नावाखालीही फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add