Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात वाहन चेकिंग मोहीम’

ताज्या बातम्या

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात वाहन चेकिंग मोहीम’

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraDecember 26, 2025No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

पोलिसांचा दणका : १३ लाख ७१ हजारांचा दंड वसूल

जळगाव प्रतिनिधी : जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी, २४ डिसेंबर रोजी धडक ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ राबवण्यात आली. मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११०० हून अधिक वाहनधारकांना पोलिसांनी दणका दिला आहे. एकाच दिवसात तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रामुख्याने विना नंबर प्लेट फिरणारी आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४६३ वाहनांवर कारवाई करून ४ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात १०७ अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळली. त्यांच्या पालकांकडून पोलिसांनी ४ लाख ४ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. “आपल्या पाल्यांच्या हाती वाहने देऊन त्यांचे आयुष्य धोक्यात घालू नका,” असे भावनिक आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

वाहतूक पोलिसांची जिल्ह्यात नाकाबंदी

जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव यांसह जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कडक नाकाबंदी केली होती. त्यामध्ये विना हेल्मेट, विना परवाना आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५३६ केसेस दाखल केल्या. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी आणि वाहतूक शाखांनी केली. आगामी काळातही अशाच प्रकारची मोहीम सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस दलाने दिले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add