Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»तहसीलदार शीतल राजपूत यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती

ताज्या बातम्या

तहसीलदार शीतल राजपूत यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती

Editorial DeskBy Editorial DeskDecember 19, 2025Updated:December 21, 2025No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

मनपा यंत्रणा सज्ज ; निवडणूक अधिकाऱ्यांच्या सुधारित नियुक्त्या जाहीर

जळगाव प्रतिनिधी :  जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली असून, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे सुधारित आदेश जाहीर केले आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीत पार पडावी, या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.

या नियुक्ती प्रक्रियेत तहसीलदार उमा ढेकळे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्या स्थानिक रहिवासी असून त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याने, संभाव्य हितसंबंध टाळण्यासाठी त्यांनी स्वतःहून या पदावरून वगळण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यांच्या या भूमिकेची दखल घेत प्रशासनाने त्यांच्या जागी जळगावच्या तहसीलदार शीतल राजपूत यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.

महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यासाठी सहा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जितेंद्र पाटील, निवृत्ती गायकवाड, जितेंद्र कुवर, महेश चौधरी, मंजूषा घाटगे आणि विनय गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी सुरेश कोळी, मंजूश्री गायकवाड, घृष्णेश्वर साळुंके, पंकज गोसावी, दादाजी जाधव, प्रसाद पुराणिक, ज्योती वसावे, जयंत शिरसाठ, ज्योती गुंजाळ, अविनाश गांगोडे, प्रकाश पाटील, विजय सूर्यवंशी, मंगेश देवरे, विशाल सुर्वे, विनोद पाटील, नितीन बागुल आणि विजय मराठे यांची सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर नियोजनाला वेग आला असून, आगामी काळात निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध टप्प्यांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add