Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»जळगाव»ब्रेकिंग न्यूज : भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ!

Editorial DeskBy Editorial DeskApril 25, 2026Updated:April 25, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

भुसावळ प्रतिनिधी |भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जळगाव येथील जात पडताळणी समितीने अवैध ठरवले आहे. या निर्णयामुळे गायत्री भंगाळे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पार्श्वभूमी आणि निवडणूक:
भुसावळ नगरपालिकेतील लोकनियुक्त नगराध्यक्षपद हे ‘अनुसूचित जाती’ (SC) प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून गायत्री चेतन भंगाळे यांनी निवडणूक लढवली आणि विजय संपादित केला होता. उमेदवारी अर्ज भरताना भंगाळे यांनी भुसावळ प्रांताधिकाऱ्यांनी जारी केलेले अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जोडले होते.

समितीचा निर्णय आणि कारण:
नियमानुसार, निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र (Validity) सादर करणे बंधनकारक असते. मात्र, ही मुदत संपण्यापूर्वीच जळगाव जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा नयना बोडर्दे, सदस्य एन.एस. रावते आणि एस.एस. महाजन यांच्या समितीने हे प्रमाणपत्र अवैध ठरविले. गायत्री भंगाळे यांचे प्रमाणपत्र अनुसूचित जाती प्रवर्गातील नसल्याचे कारण समितीने दिले आहे.

तक्रार आणि पुढील कारवाई:
प्रमोद सावकारे, रजनी संजय सावकारे, संजय तायडे आणि राहुल तायडे यांच्या तक्रारीवरून ही कायदेशीर प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, या प्रकरणात चुकीचे प्रमाणपत्र जारी केल्याचा ठपका ठेवत भुसावळच्या तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांवरही कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. आता या निर्णयामुळे गायत्री भंगाळे यांचे पद जाणार का आणि या प्रकरणाला पुढे कोणते वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​

bhusawal corporation politics
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add