Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»वाळू तस्कर, वाडजी फाट्यावर छापा; ट्रॅक्टरसह माल जप्त !

क्राईम

वाळू तस्कर, वाडजी फाट्यावर छापा; ट्रॅक्टरसह माल जप्त !

Editorial DeskBy Editorial DeskApril 26, 2026Updated:April 26, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

भडगाव प्रतिनिधी । भडगाव पोलिसांच्या गस्ती पथकाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई केली असून, वाडजी फाटा परिसरात वाळूची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भडगाव तालुक्यातील वडजी फाटा परिसरातून अवैधपणे वाळूची वाहतूक होत आल्याची गोपनिय माहिती भडगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी शनिवारी २५ एप्रिल रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास गस्तीवर होते. यावेळी विनाक्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैधपणे वाळू वाहतूक करणारे वाहन पोलीसांनी पकडले, यावेळी चालक आणि मालक यांच्याकडे वाळू वाहतूकीचा परवाना दाखविण्यास सांगितले. त्यावेळी दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार पोलीसांनी वाळूने भरलेले वाहन पकडले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी संतोष पाटील यांच्या तक्रारीवरून योगेश वसंत कोल्हे (रा. बालसर, ता. भडगाव) आणि सागर भालचंद्र पाटील (रा. वाक, ता. भडगाव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि वाळूने भरलेले वाहन जप्त केले आहे.

bhadgaon crime crime news Jalgaon
Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदे मार्गदर्शन शिबिराला जळगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

July 28, 2026

शेतात घुसून पिकाची नासधूस; भडगाव पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 27, 2026

जामनेरमध्ये ‘महाराजस्व समाधान शिबिर’चा शुभारंभ; मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

July 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add