Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»अतिक्रमण मोहिमेला वेग : रस्त्यावरून मांस विक्री व ढाबे हटविले, १२ गाड्या जप्त

क्राईम

अतिक्रमण मोहिमेला वेग : रस्त्यावरून मांस विक्री व ढाबे हटविले, १२ गाड्या जप्त

Editorial DeskBy Editorial DeskApril 30, 2026Updated:April 30, 2026No Comments1 Min Read
WhatsApp Facebook Twitter

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला जळगाव महानगरपालिकेने गुरुवारी नवी उंची गाठली. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने सुप्रीम कॉलनी ते जळगाव टोल नाका या महामार्गावर धडक कारवाई करताना १७ मांस विक्रेते व ९ ढाबे जमीनदोस्त केले. तसेच बेकायदेशीर व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या १२ गाड्या जप्त करण्यात आल्या.

गेल्या महिन्याभरापासून पालिकेने शहरातील विविध भागांत अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली आहे. यापूर्वी इच्छादेवी चौक, अजिंठा चौक, आकाशवाणी चौक ते खोटे नगर तसेच अजिंठा चौक ते एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले होते. आजची कारवाई ही त्याच मोहिमेचा एक भाग आहे.

विशेष म्हणजे, गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गावर विनापरवाना मांस विक्री आणि छोटे-मोठे ढाबे सुरू होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. या कारवाईनंतर स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

अतिक्रमण विभागाचे अध्यक्ष संजय ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला की, “पुन्हा कोणीही बेकायदेशीरपणे दुकाने उभारण्याचा प्रयत्न केला, तर दंडात्मक व अधिक तीव्र कारवाई केली जाईल.” पालिकेने पुढील दिवसांत शहरातील अन्य भागांतही अशाच प्रकारची मोहीम राबविण्याचे संकेत दिले आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

फेसर्डी गावाच्या मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर; मनसे शेतकरी सेनेची जिल्हा परिषदेत धडक

July 28, 2026

चुंचाळेत गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; देशभरातून भाविकांचे आगमन सुरू

July 28, 2026

यावलमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी; महर्षी व्यास मंदिरात हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित

July 28, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add