Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»किनगाव येथे आई भवानी मातेची यात्रा उत्साहात सुरू

ताज्या बातम्या

किनगाव येथे आई भवानी मातेची यात्रा उत्साहात सुरू

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 20, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

पहाटेच्या शुभमुहूर्तावर अभिषेक पूजनाने यात्रेला प्रारंभ

जळगाव | MahaLive News : किनगाव येथे आज सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात आई भवानी मातेची यात्रा सुरू झाली आहे. यावर्षी यात्रेची सुरुवात नव्या परंपरेने झाल्याने गावात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक रंगून गेले आहे.पहाटे पाच वाजता मातेचा ध्वज,गावात दोनदा परिक्रमा भवानी मातेच्या शिष्टमंडळाच्या नियोजनानुसार, या वर्षी यात्रेची सुरुवात विशेष पद्धतीने झाली.

पहाटे पाच वाजता भवानी मातेचा ध्वज ढोल–ताशांच्या निनादात गावात दोन वेळा फिरवण्यात आला.गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून यात्रा अधिक भक्तिमय झाली.ध्वज परिक्रमेच्या नंतर चार वाजता अभिषेक–पूजन या वर्षी प्रथमच नवीन परंपरेनुसार ध्वज परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर, पहाटे चार वाजता (विशेष शुभमुहूर्तावर) भवानी मातेच्या मंदिरात अभिषेक व पूजन करण्यात आले. ही पूजा सरपंच स्नेहल मिलिंद चौधरी व त्यांचे पती मिलिंद प्रभाकर चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाली.

सालाबादप्रमाणे नऊ वाजता मुख्य मिरवणूक पहाटेच्या परंपरांनंतर, सकाळी नऊ वाजता मातेच्या प्रतिमेचे पूजन करून बँड पथकासह गावातील मुख्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.मंदिर परिसर सजला रोषणाईने भवानी मातेच्या मंदिराची विशेष रोषणाई, सजावट आणि विद्युत प्रकाशयोजना यात्रेला आकर्षक रूप देत आहे.लोकनाट्य व तमाशा मंडळांची दमदार मैफिल यावर्षी यात्रेसाठी अनेक लोकनाट्य व तमाशा पथकांचे आयोजन करण्यात आले असून, रात्रीपर्यंत रंगणारे सांस्कृतिक कार्यक्रम भाविकांना आकर्षित करत आहेत.

गुळाची जलेबी ,यात्रेची खास ओळख या यात्रेचे विशेष आकर्षण असलेली गुळाची जलेबी यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांच्या पसंतीस उतरली आहे.झोके–पाळण्यांची रेलचेल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी झोके, पाळणे आणि वस्तूंचे स्टॉल्स यात्रेत विशेष आकर्षण ठरत आहेत.


सुरक्षा व्यवस्थेसाठी कडक पोलीस बंदोबस्त यावल PI धारबळे यांच्या नेतृत्वाखाली यात्रेत कडक बंदोबस्त तैनात असून, वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जात आहे. यात्रेच्या आयोजनामागे सामूहिक नेतृत्व या वर्षीच्या यात्रेचे उत्तम नियोजन गावातील सरपंच स्नेहल मिलिंद चौधरी, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, भवानी माता यात्रा उत्सव समिती आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे केले आहे. यामुळे यात्रा शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add