Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»क्राईम»जळगावात बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; मालकांना ६० दिवसांची अंतिम मुदत

क्राईम

जळगावात बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; मालकांना ६० दिवसांची अंतिम मुदत

Editorial DeskBy Editorial DeskJune 2, 2026Updated:June 2, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

​जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आवारात गेल्या अनेक वर्षांपासून बेवारस स्थितीत पडून असलेल्या १० दुचाकी वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावले उचलली आहेत. या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यापूर्वी मूळ मालकांना शोधण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी २ जून रोजी एक अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संबंधित वाहनधारकांनी पुढील ६० दिवसांच्या (२ महिने) आत योग्य पुराव्यांसह आपल्या वाहनांवर मालकी हक्क सिद्ध करावा, असे आवाहन याद्वारे करण्यात आले आहे.

​एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या या बेवारस वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, अद्याप कोणीही या वाहनांवर आपला हक्क सांगण्यासाठी किंवा दावा दाखल करण्यासाठी पुढे आलेले नाही. अनेक वर्षांपासून ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात उघड्यावर पडून असल्याने ती गंजून खराब होत आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८५ अन्वये मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून पोलीस अधीक्षकांनी हा जाहीरनामा जारी केला आहे. 

लिलावात काढण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये होंडा युनिकॉर्न, सीडी डिलक्स, सीडी १०० एसएस (MH 19 K 4246), स्प्लेंडर (MH 19 AL 3256), बजाज डिस्कव्हर, पल्सर (MH 19 N 6782), होंडा शाईन आणि पल्सर १५० (MH 05 AY 4975) अशा एकूण १० दुचाकींचा समावेश आहे. 

ज्या नागरिकांची वाहने गहाळ झाली आहेत, त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत मूळ दस्तऐवज, विमा हक्क किंवा तारण हक्काच्या कागदपत्रांसह संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. मुदत संपल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८७ नुसार या सर्व वाहनांचा जाहीर लिलाव करून त्यांची निर्गती केली जाईल व त्यानंतर कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही, असे पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Share. WhatsApp Facebook Twitter
Editorial Desk
  • Website

Related Posts

जामनेरमध्ये ३ लाखांचा गांजा जप्त; आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार

September 15, 2026

अमळनेरात बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला; ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026

मुलगा मानलेल्या भाच्याचाच घातक कट; वृद्धेच्या खुनाचा ३५ दिवसांनी उलगडा

September 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add