Close Menu
Maha Live NewsMaha Live News
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Facebook X (Twitter) Instagram
Maha Live NewsMaha Live News
Button
  • Home
  • ताज्या बातम्या
  • जळगाव
  • परिवहन
  • राजकारण
Maha Live NewsMaha Live News
Home»ताज्या बातम्या»अट्रावल येथे मुंजोबा महाराजांच्या यात्रेला प्रारंभ

ताज्या बातम्या

अट्रावल येथे मुंजोबा महाराजांच्या यात्रेला प्रारंभ

Nilesh AjmeraBy Nilesh AjmeraJanuary 20, 2026No Comments2 Mins Read
WhatsApp Facebook Twitter

महिनाभर भाविकांनाची रेलचेल : नवस फेडण्यासाठी होणार गर्दी

यावल : तालुक्यातील अट्रावल येथील जागृत मुंजोबा देवस्थान यात्रोत्सव 19 जानेवारी सोमवारपासून सुरु झाली आहे. माघ शुद्ध महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यानंतर शनिवार दि. 24 रोजी, सोमवार दि. 26 रोजी, शनिवार दि. 31 असे चार वार असून 1 फेबुवारीला पौणिमेला यात्रेचा समारोप होईल.


अट्रावल- भालोद रस्त्यावर अनेक वर्षापासून जीर्ण वडाच्या वृक्षाखाली मुंजोबा देवस्थान आहे. या देवस्थानावर खान्देशवासीयांसह राज्य-परराज्यातील भाविकांची मोठी श्रद्धा आहे. भाविक देवस्थानावर नवस मानत मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात. शेतात सोयीची जागा मिळण्यासाठी महिना -दोन महिने अगोदरच मान देणाऱ्या भाविकांना जागा निश्चित करावी लागते. यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असल्याचे मुंजोबा मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावल व भुसावळ आगारातून ज्यादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंजोबा देवस्थानसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पोलीस यंत्रणा देखील सतर्क असल्याने चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो.


यात्रेनिमित्त जिल्ह्यासह मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, खंडवा व इतरत्र ठिकाणाहून खेळणी, पाळणे, सर्कस इतरत्र खेळ याठिकाणी मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. दर्शनाबरोबरच मनोरंजनाची साधनेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच मोठ-मोठे विविध स्टॉल येथे सजवून लावलेले असतात. येथे करमणुकीची साधने, खेळणी, संसार उपयोगी साहित्य, खाद्य पदार्थ विक्रीची मोठे दुकाने स्टॉल लावण्यात आले आहेत. उंच आकाश पाळणे या यात्रेचे आकर्षण आहे. अट्रावल येथे यावल येथून सहा किलोमीटर व अट्रावल- भालोद रस्त्यावर अट्रावल गावाजवळून पूर्वेस दोन किलोमीटर अंतरावर एस.टी. बसने, खासगी वाहनाने जाता येते, याशिवाय भुसावळ- यावल रोडवर राजोरा फाट्यावरून अट्रावल येथे दर्शना करीता जाता येते. यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावल व फैजपूर पोलिस बदोबस्त ठेवत आहे.

भाविकांच्या भक्तीचा मळा फुलणार!
मुंजोबा महाराजांच्या यात्रेनिमित्त परिसरात उत्साहाचे, भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून महिनाभर भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करीत असतात. नवसाला पावणारे हे क्षेत्र असल्याने येथे नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी होते. साखर व गुळाच्या रेवड्या येथे प्रसिद्ध असून पुढील काही दिवस येथे भक्तीचा मळा फुलणार आहे. संस्थांकडून सर्व सुविधा पुरविण्यात येणार असून त्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
Nilesh Ajmera
  • Website

Related Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे.

March 15, 2026

एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षा चालकांना देखील फटका बसला आहे.

March 15, 2026

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याच्या रागातून तरुणाचा खून; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Leave A Reply Cancel Reply

Facebook X (Twitter) Instagram Pinterest
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp-Add